वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करा :-डॉ.सतिश वारजुकर

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-

         जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोठ्या संख्येत आहेत. ग्रामीण भागात एका-एका प्राथमिक आरोग्य केंद्राला १५ ते २० गावे जोडलेली आहेत. परंतु, त्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे.

       रुग्णांची गैरसोय लक्षात घेता रुग्णालयात रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ तथा समन्व्यक चिमूर विधानसभाक्षेत्राचे डॉ. सतीश वारजूकर यांनी केली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. यादिवसात दूषित पाण्यामुळे तसेच डासांच्या प्रकोपामुळे हिवताप, मलेरिया, – डायरिया, चिकनं गुणिया या सारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

           त्यामुळे आरोग्य केंद्रे स्वयंपूर्ण असणे आवश्यक असते.परंतु,अनेक रुग्णालयात रिक्तपदे असून,रुग्णांवर तात्काळ उपचार होत नाही.त्यामुळे रुग्णांची होरपळ होते.अनेकदा उपचाराअभावी रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असतात. शेतकरी किंवा मजूर शेतीमध्ये काम करत असताना त्यांना विचू, साप तर कधी कधी इंतर विषारी किळे यांच्या दंशाने विषबाधा होण्याची शक्यता असते.अशावेळी रुग्णांवर वेळीच उपचार होणे गरजेचे असते.

           सद्या स्थितीत पावसाळा सुरु झाला असून अनेक रुग्ण येत असतात परंतु वैधकीय अधिकारी व कर्मचारी अभावी त्यांना एक ते दोन तास वाट पाहावी लागते शेवटी रुग्ण हतबल होऊन प्राव्हेस्ट दवाखान्यात जातात परंतु पैशा अभावी तिथे पण उपचार करणे शक्य नाही,कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही.

         तर कुठे परिचारिका उपस्थित राहत नाही. परिणामी रुग्णांवर उपचार होत नाही. रुग्णांची गैरसोय लक्षात घेता चिमूर विधानसभा क्षेत्रातील तथा जिल्यातील प्राथमिक आरोय केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केली आहे.