शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगांव(पि.):- माना आदिम जमात समन्वय समिती,आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माना आदिम जमातीचा सामूहिक विवाह सोहळ्याचे मालेवाडा येथे आयोजन करण्यात आले होते.
विवाह सोहळ्या प्रसंगी सुधाकर सोनवणे अध्यक्ष माना आदिम जमात मंडळ मुंबई,वासुदेव धारणे माजी अध्यक्ष माना आदिम जमात मंडळ मुंबई,अरविंद सांदेकर सामाजिक कार्यकर्ता नागपूर,मंगेश धाडसे आदिवासी महामंडळ संचालक,नाशिक तथा बाजार समिती सभापती चिमूर,अरविंद दडमल उपाध्यक्ष माना आदिम जमात मंडळ मुंबई,मधूकर ठोक,वामनराव सावसाकडे, बाळकृष्ण सावसाकडे,रामराव नन्नावरे,सुभाष दडमल,डॉ.गोदिराव चौधरी,कृष्णा रंदये,कवडू खडसंग,विकास बारेकर,अल्का गंगाधर भरडे माना जमात महिला समन्वयक समिती नागपूर,रेखा दडमल माना जमात महिला समन्वयक समिती नागपूर,सविता चौधरी माना जमात महिला समन्वयक समिती नागपूर, यांच्यासह आदीं मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या पवित्र आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन अत्यंत अभिमानास्पद आणि समाधानकारक क्षण आणि समाजातील अनेक गरजू कुटुंबांना साधेपणाने विवाह लावण्याचा जो उद्देश हीच खरी या कार्यक्रमाची यशस्वीता आहे.
नवदांपत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद,व त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील समाधान आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.



