Home Maharashtra वन्य प्राण्यांसाठी पाणपोई : वनपरिक्षेत्र अधिकारी कुरखेडा यांचा स्तुत्य उपक्रम…

वन्य प्राण्यांसाठी पाणपोई : वनपरिक्षेत्र अधिकारी कुरखेडा यांचा स्तुत्य उपक्रम…

      राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा.. 

    उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासत असते.ही गरज लक्षात घेऊन वनविभाग वडसा अंतर्गत वनपरिक्षेत्र कुरखेडा यांनी जंगलात पक्षी पाखरं,मुक्या जनावरासाठी पाणपोईची व्यवस्था करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

            या उपक्रमांतर्गत जंगलातील विविध ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली असून त्यामुळे पक्षी व वन्य प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी वन्यजीवांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

 

      वनविभागाच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून स्वागत होत असून,पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक आहे. 

               नागरिकांनीही पुढाकार घेऊन आपल्या परिसरात पाणपोई उभाराव्यात,असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी एल.एम.बोपुलवाड,वन सहायक संजय कंकलवार,वनरक्षक सपना वालदे यानी केले आहे.या कार्यात विवेक गहाणे,विकी गोबाडे यानी सहकार्य केले.