अरविंदोच्या अधिकाऱ्याने स्थानिक मंदिरातून मुर्तीचे केले स्थानांतरण….

      उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

        भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथे अरविंदोच्या अधिकाऱ्याने शतकापासून असलेले ग्रामदेव भंगाराम माउली मुर्तीचे स्थानिक मंदिरातून मुर्तीचे स्थानांतरण करून बेलोरा ग्रामवासियांचे हिंदू देवतेबद्दल मने दुखविली आहे. हा प्रकार दि 9 जुलै ला सकाळ च्या सुमारस झाला आहे.

         अरविंदो कंपनी चे ए जी एम अजय सिंग या अधिकाऱ्याने आपला मनमानी कारभार करुन् भंगाराम माउली मुर्तीचे स्थानिक मंदिरातून मुर्तीचे स्थानांतरण करून ग्रामवासियां मधे असंतोष चे वातावरण निर्माण केले. 

        याची माहिती भाजपाचे युवा नेते आकाश वानखेड़े याना होताच् त्यानी ही माहिती भाजपा चे भद्रावती वरोरा क्षेत्राचे निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर याना दिली. त्यानी ग्रामवासी समवेत मंदीर परिसरात भंगाराम माउली मुर्तीचे स्थानिक मंदिरात पुन्हा मुर्तीचे स्थानांतरण करुन भद्रावती पोलिस, थानेदार बिपिन इंगडे यांचे बंदोबस्तात् अरविंदो कंपनी चे ए जी एम अजय सिंग या अधिकाऱ्याला ग्रामवासी ची माफी मागन्यास भाग पाडुन हे वातावरण पुन्हा आटोक्यात् केले. 

         सदर हे असंतोष चे वातावरण शांत करण्यासाठी पुढाकर घेवून भाजपा चे भद्रावती वरोरा क्षेत्राचे निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर , नरेंद्र जीवतोडे शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर, आकाश वानखेड़े युवा नेते, सिकंदर शेख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, संजय राय, पप्पू शेख, रूपेश मांढरे, सूरज पेंदाम उपस्थित होते.