डॉ.सोमदत्त करंजेकर सरसावले भेलप्रकल्प ग्रस्तांच्या मदतीला…

ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली -विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची क्षमता असलेल्या साकोली तालुक्यातील भेल प्रकल्पाची लिज एमआयडीसी ने ऑगस्ट 2023 महिन्यात रद्द केली.

               त्यामुळे हा प्रकल्प बांधकामापूर्वीच नामशेष झाला या प्रकल्पासाठी शासनाने खरेदी केलेली 510 एकर जागा आता गाजर गवताने भरलीय त्यामुळे या आशेवर असलेल्या तरुणांचे स्वप्नही भंगले आता या जागेवर नवीन उद्योग सुरू करावा व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भेल प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपोषणाला बसले.

            5 जुलैला प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाला बसले असता उपोषण स्थळी डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली असता लवकरात लवकर तोडगा काढून प्रकल्प सुरू करू असे आश्वासन दिले.

         भेटीनंतर साकोली चे तहसीलदार निलेश कदम व भेल प्रकल्पाचे अप्पर महाप्रबंधक जितेंद्र गणवीर यांनी उपोषण स्थळी भेट दिली व सांगितले की एमआयडीसी ने मागच्या वर्षी भेलची लिज रद्द केली परंतु या जागेची लि रद्द करण्यासाठी प्रशासनाने विनंती केली.

           तसेच उच्च न्यायालयात जाऊन लिज रद्द करण्यावर स्थगिती मिळवली. न्यायालयाचा निकाल व एमआयडीसीची परवानगी मिळताच काम सुरू करतील असे पत्रकाद्वारे भेलचे रवींद्रसिंह यांनी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले यावर तहसीलदारांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तसेच भेलने हा प्रकल्प सुरू करण्याबाबत हमी दिल्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली.