Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — अज्ञात वाहनाच्या धडकेत चुरमुरा गावा जवळ एक जागीच...

ब्रेकिंग न्यूज… — अज्ञात वाहनाच्या धडकेत चुरमुरा गावा जवळ एक जागीच ठार…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी :- तालुक्यातील मौजा वासाळा येथील फिर्यादी शुभम वासुदेव उरकुडे वय २७ वर्षे धंदा मजुरी रा.वासाळा ता.आरमोरी यांचे फिर्यादी वरुन मृतक नामे कुंदन वासुदेव उरकुडे वय २९ वर्ष रा. वासाळा ता. आरमोरी जि .गडचिरोली हा मौजा वसा ( पोर्ला ) ता .जि. गडचिरोली. येथे दि.२९ एप्रिल ला आपल्या काही खाजगी कामा निमित्त गेला असता काम आटोपून येथून स्वगावी मौजा वासाळा ता. आरमोरी जिल्हा.गडचिरोली येथे पायीपायी चालत येत असताना मौजा चुरमुरा गावाच्या समोर १५ कि.मी.दक्षिणेस १:४० ते ७ वा. चे दरम्यान कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे व हगईने चालवून पायीपायी चालत येत असलेल्या कुंदन वासुदेव उरकुडे यास मागेहून धडक देऊन मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत झाला व घटनास्थळावरून वाहनासह पळून गेला आहे.

       ..अशा फिर्यादीच्या फिर्याद वरून अज्ञात चालका विरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे २८१ , १०६,( १ ) कलमान्वये १८४,१३४ ( अ ) १३४ ( ब ) मोवाका चंद्रप्रकाश निमसरकार यांनी गुन्हा नोंद करून अधिक तपास चंपा कामतकर या करिता आहेत.