Home Maharashtra शासकीय इमारती बांधकामाकरीता कंत्राटदार करतो अवैध रेतीचा वापर… — महसुल विभागानी...

शासकीय इमारती बांधकामाकरीता कंत्राटदार करतो अवैध रेतीचा वापर… — महसुल विभागानी चौकशी करावी… — कंत्राटदारावर कारवाई करण्याची केली केवलसिंग जूनी तालूका संघटक,(शिवसेना उ.बा.ठा) यांनी मागणी…

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

        चिमुर तालूक्यातील मौजा जांभुळघाट पोस्ट बेसीक शासकीय निवासी आश्रम शाळा येथे नविन इमारतीचे बांधकाम सुरू असून,या इमारतीच्या बांधकामासाठी अवैध रेतीचा वापर कंत्राटदार करीत आहे.

             या बांधकामासाठी शेकडो ब्रास अवैध रेतीचा वापर कंत्राटदार करीत आहे.शेकडो ब्रासचा साठा कंत्राटदाराने इमारत बांधकाम ठिकाणी साठवून ठेवलेला आहे.

        या साठाची चिमूर महसूल विभागाकडून योग्य चौकशी करून कंत्राटदारावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उबाठा चिमूर तालुका संघटक केवलसिंग जुनी यांनी केली आहे.