Home आरोग्य आरोग्य केंद्रासह,उपजिल्हा रुग्णालयात ओपिडीसाठी लागणाऱ्या अधिकृत चिठ्यांचा तुटवडा…

आरोग्य केंद्रासह,उपजिल्हा रुग्णालयात ओपिडीसाठी लागणाऱ्या अधिकृत चिठ्यांचा तुटवडा…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

      ओपीडीसाठी लागणाऱ्या अधिकृत चिठ्ठ्यांचा (स्टेशनरी) मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून,रुग्णांना साध्या कागदावर औषधांची नावे लिहून देण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. 

       या प्रकारामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

      रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना नियमित छापील ओपीडी चिठ्ठ्या उपलब्ध नसल्याने डॉक्टरांकडून साध्या कागदावर औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जात आहे.

      अशा चिठ्ठ्यांवर रुग्णांची नाव,नोंद क्रमांक लिहुन दिल्या जाते.परंतु उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकृत शिक्का नसल्याने भविष्यातील उपचार व नोंदी ठेवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      काही रुग्णांनी सांगितले की,“साध्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी अधिकृत आहे की नाही तसेच ती हरवल्यास पुढील उपचार साठी जिल्हा रुग्णालयात किंवा दुसर्या रुग्णालयात जाण्या करिता अधिकृत आहे काय.” यामुळे रुग्णांची गैरसोय वाढत आहे.

      या संपूर्ण प्रकाराकडे वैद्यकीय अधिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून व रूग्णांकडून केला जात आहे. 

      दरम्यान,संबंधित जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.