Home देशविदेश ईश्वर धर्म आणि सत्य…

ईश्वर धर्म आणि सत्य…

     माणूस हा विचारशील प्राणी आहे.परंतु प्राणी पक्षी हे पण विचार करतात,परंतु त्यांच्या बुद्धीला ब्रेक ( मर्यादा ) आहे.ते फक्त जीवनाचा अर्थ ‘ जगणे ‘ एव्हढाच लावतात.म्हणून फक्त जिवंत राहण्यासाठी काय करावे ? कसे करावे ? एव्हढेच त्यांना कळते.त्यांचे जीवन हे मर्यादित असते.त्यांना फक्त पोटाचीभूक,शारीरिकभुक ( संभोग ), सावली,आसरा, ऊन वारा पाऊस या पासून आणि इतर जनावरांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे , एव्हढेच ज्ञान असते, या ज्ञानाला मर्यादा असते, या ज्ञानात ते काही संशोधन करू शकत नाही त, परंतु माणूस हा जरी प्राणी असला तरी, जनावर अपेक्षा या प्राण्यात बुद्धी आणि मन नावाच्या ज्या दोन गोष्टी आहेत, ज्या मेंदू या त्याच्या एका शारीरिक अवयवातून निर्माण होतात, त्याच्या आधारे तो कल्पना करू शकतो, विचार करू शकतो, त्याच्यात भावना निर्माण होतात, माणसाचा मेंदू हा विचार भावना संकल्पना चिकित्सा संशोधन नवनिर्मिती या गोष्टी करत असतो, कारण जनावरांमध्ये जशी बुद्धीला मर्यादा आहे तशी माणसाच्या बुद्धीला मर्यादा नाही, म्हणजेच माणसाची बुद्धी ही अमर्याद आहे, ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने विचार करू शकते. सत्य आणि असत्य याचा शोध घेऊ शकते. योग्य काय आणि अयोग्य काय, खरे काय आणि खोटे काय, असा तोलिक विचार पण माणूस करू शकतो. पण केला तर च. जो माणूस असलेल्या परिस्थितीबद्दल काही प्रश्नच निर्माण करीत नाही, किंवा तुलनात्मक अभ्यास करीत नाही, चिकित्सा करीत नाही, संशोधन करीत नाही, शोध लावत नाही, काही प्रयोग करीत नाही, किंवा ज्यांनी शोध लावले त्यास मान्य करीत नाही, असा माणूस बुद्धी असूनही निर्बुद्ध समजावा. किंवा आळशी तरी समजावा. परंतु बुद्धिमान जी माणसे असतात, ती चिकित्सक किंवा विज्ञानवादी किंवा प्रयोगवादी किंवा अनुभव सिद्ध गोष्टी मांडणारे असतातच असे नाही, तेव्हा त्यांना ‘ वादी ‘ असे म्हणतात, परंतु असे वादी की जे सत्य कबूल करीत नाहीत. किंवा सत्याला माहीत नाहीत, आणि ज्यांना सत्य कळले असे लोक सत्य सांगत नाहीत, ते लपवतात, आपला हेतू साध्य करण्यासाठी समाजास चुकीचे किंवा असत्य वर्तन करायला लावतात, किंवा असत्याच्या मार्गावर चालायला लावतात, तुम्हा भाग पडतात, सत्यनामाणारे विद्वान हे जनतेची दिशाभूल करीत असतात. 

       ‘ सत्य ‘ याचा अर्थ ‘ असणे ‘ असत्य याचा अर्थ नसणे. जे नाही त्याला आहे म्हणणे म्हणजेच खोटे बोलणे होय, किंवा सत्य मान्य न करणे होय. सत्य म्हणजे एखादी गोष्ट एखादा भौतिक पदार्थ किंवा वस्तू ही डोळ्याला दिसते, तरी ती नव्हे असे म्हणणे म्हणजे खोटे बोलणे आहे, किंवा सत्य हे मान्य न करणे आहे. आणि डोळ्याला जे दिसत नाही, ते आहे, असे म्हणणे म्हणजे खोटे बोलणे होईल किंवा सत्य न मानणे होय. पारलौकिक तत्त्वज्ञानात ‘ ब्रह्मम सत्यम जगन मी थ्या ‘ असे म्हटले आहे, याचा अर्थ डोळ्याला हे जे जग दिसते ते खोटे आहे, आणि डोळ्याला न दिसणारे जग हे खरे आहे, असे म्हणणे होय. खरे तर सत्य हे फक्त डोळ्यालाच दिसते असे नाही, तर सत्याची माणसाला जाणीव आणि नेहमी पण होत असते, नेणीव म्हणजे अनुभूती. उदा. हवा किंवा वारा डोळ्याला दिसत नाही परंतु माणसाच्या अंगाला त्याचा स्पर्श होतो, म्हणून त्याची जाणीव होते. म्हणून हवा जरी डोळ्याला दिसत नसली तरी तो एक वैज्ञानिक दृष्ट्या पदार्थच आहे म्हणून त्याची जाणीव होते. दुसरे उदाहरण लोणी आणि तुपाचे ताकाचे, दुधात दही टाक लोणी तूप असते, परंतु हे मिळवण्यासाठी किंवा दिसण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया करावी लागते, जसे की दूध तापविणे, दुधाला विरजण घालणं, यामुळे दुधाची दही बनते, दह्याची जर त्यात पाणी टाकून घुसळून केली तर त्यातून ताक निर्माण होते, ताकाला अजून घुसळले तर त्यातून लोणी बाहेर येते, लोणीला तापविले तर त्यातून तूप तयार होते, ही सारी प्रक्रिया करावी लागते, तेव्हा डोळ्याला न दिसणाऱ्या दुधातील पदार्थ डोळ्याला दिसायला लागतात. खरे तर हा सत्याचा प्रयोग आहे, परंतु सत्याचे प्रयोग न करता, सत्याचा अनुभव न घेता, त्याचे चिंतन मना न करता, वैज्ञानिकांनी किंवा संशोधकांनी केलेले संशोधन प्रयोग न मानता, केवळ काहीतरी कल्पना करायच्या, कल्पनेच्या विश्वात वापरायचे, त्याचा खोटा आनंद घ्यायचा, आणि सामान्य जनतेची दिशाभूल करायची, यास यासच असत्यवर्तन असे म्हणतात. म्हणून पारलौकिक तत्त्वज्ञान हे खोटे ठरते, ज्यात स्वर्ग मृत्यु पाताळ, देव दैव मोक्ष भाग्य पाप पुण्य अशा काही संकल्पना केलेल्या आहेत की ज्याला काही आधारच नाही, या साऱ्या कल्पनाच आहेत म्हणजे बिनबुडाच्या आहेत. 

    डोळे कान नाक त्वचा जीभ हे माणसाचे पंचंद्रिय आहेत, याद्वारे माणसाला अनुभूती किंवा अनुभव घेता येतो. उदा. डोळ्याने जे आहे ते पाहता येते, परंतु जे नाही ते कसे दिसणार ? कानाने ऐकता येते, नाकाने फुला च्या सुगंधाचा वास घेता येतो, फुल दिसते पण त्याचा सुगंध दिसत नाही, त्याला सुगंध आहे हे नाकाद्वारे सिद्ध करता येते, हवा दिसत नाही पण त्वचेला स्पर्श झाल्यामुळे ती आहे असे म्हणता येते, पदार्थ पदार्थ हे आंबट तिखट की गोड हे जिभेने अनुभूती मिळते. याचा अर्थ पंचंद्रियाद्वारे माणसाला सत्यशोधता येते. अर्थात भौतिक पदार्थ किंवा वस्तू चेच सत्तेतून सापडते. परंतु बहुतेक पदार्थ किंवा वस्तू नाहीत पण काही काल्पनिक गोष्टी आहेत किंवा काही संकल्पना आहेत किंवा काही विचार आपण ऐकतो ते सत्य की असत्य हे कसे समजायचे ? उदा. ईश्वर, धर्म, व्यवस्था, समता, विषमता, न्याय,नीती, दया क्षमा शांती इत्यादी या संकल्पना आहेत, विचार आहेत, माणसाच्या मेंदूतूनच निघालेल्या या गोष्टी आहेत, ह्या भौतिक नाहीत तर काल्पनिक आहेत, माणसाने काही कल्पना केली त्यातून त्या कल्पनेला विचाराची जोड मिळाली आणि म्हणून कल्पना ह्या संकल्पना बनल्या. पण ह्या संकल्पना माणसाच्या पंचंद्रियांना त्यांची जाणीव जरी होत नसली तरी, चिंतन मनन चिकित्सा समीक्षण परीक्षण विवेचन करून या संकल्पना सत्य की असत्य ? याचा शोध घेता येतो. एखादे तत्त्व आणि त्या तत्त्वाबद्दल चे विचार म्हणजेच तत्त्वज्ञान हे खरे की खोटे? हे संशोधन आणि चिंतन समीक्षण करून ठरविता येते. परंतु असे न करता, किंवा ज्यांनी असे प्रयोग केलेले आहेत, अनुभव घेतलेला आहे, किंवा त्यांचे विवेचन चिंतन समीक्षण हे पुस्तक रूपाने मांडून ठेवलेले आहेत, ते न वाचताच, किंवा त्या विषयावर विषयावरचे भाषण किंवा चर्चा करताच, एकतर्फी विचार मान्य करण्याची सवय जगातील जवळजवळ 90% लोकांना आहे. म्हणूनच जग हे चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, त्याचा परिणाम म्हणून आता महायुद्ध होत आहेत, माणसं माणसांना मारीत निघालेले आहेत. कुणी कुणाचा विचार करायला तयार नाहीत. डोक्याचा वापर करीत नाहीत त्याचा हा दुष्परिणाम आहे. 

     ईश्वर असो की धर्म असो हे माणसाला का सुचले ? त्याचा शोध घेणे हे 90 टक्के लोकांना आवश्यक वाटत नाही, एखादा विचार कोणी जर आपल्यासमोर मांडला किंवा एखादे पुस्तक जर आपण वाचलो, तर त्यावर आपण समतोल विचार करीत नाही, एकतर बाबा वाक्य प्रमाण, म्हणून जे सांगितले ते ऐकले, आणि अमलात आणले, असे घडताना दिसते, परंतु त्यातील सत्यता पडताळून पाण्याची सवय शाळेमधूनच मुलांना लावायला पाहिजे, किंवा कुटुंबात मोठ्याने लहानांना चिकित्सेची सवय लावायला पाहिजे, सत्य शोधण्याची सवय लहान मुलांना लावायला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांना गाणी गोष्टी खेळ याद्वारे शिक्षण द्यायला पाहिजे, सत्याचे प्रयोग करून दाखवायला पाहिजे, परंतु असे घडताना दिसत नाही, उलट जे असत्य आहे, जे खोटे आहे, ज्याला काय आधारच नाही, ये पार्लो ठीक आहे, त्याचाच अभ्यासक्रमातून किंवा कुटुंबातून प्रचार प्रसार केल्या जातो, आणि ही छोटी मुले मोठे होतात तेव्हा त्याची दुष्परिणाम दिसून येतात. देवा बद्दलची भांडणे, धर्मांची भांडणे, जातीची भांडणे, आर्थिक विषमता म्हणजे वर्गाची भांडणे, सगळीकडे भांडणच भांडण आणि मारामाऱ्याच मारा मारामाऱ्या आणि हिंसा, असुरक्षितता, भीतीचे वातावरण अशा परिस्थितीत सर्वच जाती-धर्माच्या लोकांना राहावे लागत आहे. ही फारच गंभीर बाब आहे. यावर एकत्र येऊन विचार करण्याची खरी गरज आहे. 

   आपण आज असुरक्षित का आहोत ? आपण एकमेकांमध्ये मारामाऱ्या का करीत आहोत ? आपण सारी माणसे सारखीच असताना एकमेकाचे दुश्मन होऊन का वावरत आहोत ? एकमेकांचे जीव का घेत आहोत ? दोन देश एकमेकांवर का आक्रमण करीत आहेत ? ही आर्थिक आणि सामाजिक विषमता का आहे ? विषमता निर्माण करणारे आणि टिकवून ठेवणारे घटक कोणते आहेत ? यावर चिंतन होणे जरुरीचे आहे. 

    माणसाची जेव्हा निर्मिती झाली, आनंद काळपर्यंतच्या शारीरिक अवयवात सुधारणा होत गेली, बदल होत गेला, माणसाचे शरीर म्हणजेच अवयव विकसित होत गेले, आणि माणसाचा मेंदू जसा जसा विकसित झाला तसा तसा तो विचार करायला लागला. परंतु विचार हा एकांगाणे करू लागला, म्हणून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याचा अर्थ अजूनही माणसाचा मेंदू परिपक्व झाला नाही, त्याची विकसित होण्याची प्रक्रिया संपली नाही असेच म्हणावे लागते. ची आरती माणसाचा मेंदू समतोल पण विचार करायला लागेल, तुलनात्मक अभ्यास करेल,सत्य शोधायला लागेल , केवळ जे ऐकले पाहिले किंवा वाचले तेच खरे न मानता, त्याची दुसरी बाजू पण पडताळून पाहायला लागेल, आणि त्यातील सत्य काय ते शोधू लागेल, तेव्हाच माणसाच्या मेंदूचा परिपूर्ण विकास झाला असे म्हणावे लागेल. आणि असे जेव्हा घडेल तेव्हाच सत्याचे दर्शन होईल, अन्यथा अशा असत्याचे दर्शन घेणे तर चालूच आहे. 

   ईश्वर आणि धर्म ही बहुतेक गोष्ट नव्हे, म्हणजे माणसाच्या पंचंद्र्यांना यांचे ज्ञान होणार नाही, अनुभव पण येणार नाही, परंतु ईश्वराने धर्म या दोन संकल्पना जेव्हा माणसाने निर्माण केल्या त्याच्या मागच्या उद्देश, त्याची कारणे शोधावीच लागतील, शिवाय त्या सत्य की असत्य ? त्याचा पण शोध घ्यावा लागेलच. कारण ईश्वराने धर्म ही संकल्पना माणसाने मान्य करून हजारो नाही तर लाख वर्ष झाले असतील, तरी या संकल्पनांचा मानवी जीवन सुखमय शांतीमय सुरक्षित प्रगतिशील भयमुक्त स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय प्रस्थापित करण्यासाठी अपुऱ्याच पडल्या आहेत असे मला वाटते. 

              लेखक 

             दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

                दिनांक : 17 जून 2026

                      फोन : 9420912209