तुकोबांच्या पालखीच्या रथासाठी देहूचे मोरे आणि पिंपळे सौदागरचे झिंजुर्डे यांच्या बैलजोडीला मान…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

देहूगाव : संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचा पालखी रथ ओढण्याचा मान देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशज सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार, पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान खेड तालुक्यातील चिंबळी येथील सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा बैलजोडी मिळाला आहे. या निमित्ताने श्री संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने या तिनही कुटुंबांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. 

       श्री संत तुकाराम महाराजांच्या 33८ व्या पायी पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार, पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान मिळाला आहे. तर सत्यवान जैद यांच्या राजा – सर्जा बैलजोडीची निवड करण्याती आल्याची माहिती संस्थानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. या बैलांची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांची पाहणी करून या निकषांनुसार बैल जोडींचे परिक्षण करण्यात आले. जी बैलजोडी पालखी रथाला शोभेल अशा दोन बैल जोडींची निवड आज जाहिर करण्यात आली. तर चौघडा गाडीला जुंपण्यासाठी सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा या बैलजोडीला मिळाला आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या 33८ व्या पायी पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पालखी रथाला जुंपण्यासाठी १८ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते तर चौघड्याच्या गाडीसाठी चार बैलजोडी मालकांनी अर्ज केलेले होते. संस्थानने स्थानिक बैलजोडी मालकांच्या बैलजोडीला पालखी रथाला ओढण्याची सेवा करण्याची संधी मिळावी ही अनेक दिवसांची इच्छा सुरेश मोरे यांच्या बैलजोडीची निवड करून पूर्ण केल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.