सुनिता मेश्राम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूरस्काराने सन्मानित.. — महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ग्रामपंचायत कडुन स्विकारला…

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही

नवरगाव महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध क्षेत्रांत सामाजिक दायीत्व जोपासुन सेवा देणाऱ्या महीलांची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूर च्या वतीने येथील सामाजीक कार्यकर्त्या सुनिता दिलीप मेश्राम यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

            सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता दिलीप मेश्राम या यशस्वी महीला स्वयंसहायत्ता समुहाच्या संघटक म्हणून त्या माध्यमातून पञावळी गृहउद्योग सुरू केला. आणि महीलांना उद्योगाला लावले. शिवाय कर्जाची नियमीत परतफेड करुन जिल्हा ग्रामीण यंञणा विभागीय कार्यक्रमामध्ये २०१७ मध्ये त्यावेळी असलेले केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहीर, वनमंञी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर यांच्या हस्ते समुहाला शिल्ड, प्रमाणपञ, पुष्पगुच्छ तसेच पाच हजार रुपयांच्या रोख रकमेसह सिंदेवाही तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळवुन दिला. व्यवसायाच्या माध्यमातून महीलांच्या आर्थिक प्रश्न सोडविण्यास हातभार लावला. शिवाय या समुहासोबतच इतर चार गट त्यांच्या नेतृत्वात काम करीत आहेत. ९० महीला असलेल्या एका सामाजिक मंडळाच्या मागील पंधरा वर्षांपासून त्या कोषाध्यक्ष असुन महीला सक्षमीकरणाचा निरंतर प्रयत्न त्यांच्याकडुन केल्या जात आहे. 

                समाजशास्ञात एम. ए. असलेल्या सुनिता मेश्राम सामाजिक कार्यात, थोर पुरुषांची जयंती, पुण्यतीथी व अशा विविध उपक्रमात सक्रिय असुन बालविवाह, हुंडा पध्दती निर्मुलन, घरगुती हिंसा यावर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन. तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या ग्रामस्वछता अभियान, वृक्षारोपन यामध्ये सक्रिय सहभागी असतात. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समीती रत्नापूर येथे चार वर्ष त्यांनी समीतीच्या माध्यमातून महीलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर विचार विनीमय , महीलांचे समुपदेशन, योग्य सल्ला व मार्गदर्शन करून वेळोवेळी त्यांच्या प्रश्नानांना वाचा फोडण्याचे काम केले. निरंतर शिक्षण केंद्राच्या माध्यमातून सहाय्यक प्रेरक म्हणून शाळाबाह्य, निरक्षर मुला मुलींना केंद्रात बोलावून शिक्षणाच्या प्रवाहात सामील करुन साक्षर बनविण्याचा प्रयत्न केला. 

                त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूर यांनी घेतली व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह व चेक स्वरुपात रक्कम देऊन सुनिता मेश्राम यांचा सरपंच कवीता सावसाकडे, उपसरपंच अशोक गभणे, ग्रामविकास अधिकारी नरेंद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य माया लोधे यांच्या हस्ते व इमरान पठाण, वासुदेव दडमल, प्रविण कामडी, रजनी काऊलकर, नजरी मेश्राम, उषाताई धारणे, हेमलता सोनटक्के, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.