ड्रीम चंद्रपूर तर्फे आयोजित “क्रीडा पर्वाची” सांगता….. — हा क्रीडा पर्व 4 दिवस चालला… — हॉकी, कबड्डी, नेटबॉल, बाईक रॅली तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम…

प्रेम गावंडे

उपसंपादक 

दखल न्युज भारत

           डेव्हलोपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पस सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे आयोजित हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती व क्रीडा दिवसाच्या अवचित्य साधून “क्रीडा पर्वाचे” आयोजन करण्यात आले होते. हा पर्व एकूण चार दिवस चालला. सुरुवातीला नेटबॉल स्पर्धा जिल्हा स्टेडियम येथे पर पडली. दुसऱ्या दिवशी C R C स्टेडियम चंद्रपूर येथे हॉकी स्पर्धा पर पडली. तिसऱ्या दिवशी अंशलेश्वर वार्ड नं. 1, विद्यार्थी चौक चंद्रपूर येथे पर पडली. पर्वाचा चौथा दिवशी संध्याकाळी 5 वाजता शहरात बाईक रॅली कळण्यात आली त्या नंतर क्रीडा पर्वाचा समारोपीय श्रमिक पत्रकार भवन, जुना वरोरा नाका चंद्रपूर येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पप्पू देशमुख माजी नगर सेवक मनपा चंद्रपूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून API सचिन राखुंडे महाराष्ट्र पोलीस, प्रदीप अडकीने समाजिक कार्यकर्ते, पाटील सर माजी क्रीडा प्रमुख ड्रॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर, निलेश शेंडे कोशाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर उपस्थित होते. 

         माजी उत्कृष्ट खेळाडू मधू कांबळे हॉकी, वर्षा तुळशीराम पेटकर कबड्डी, तसेच पायल सोनी नेटबॉल, मयूर मिलमिले नेटबॉल, रुचिता संजीव आंबेकर ज्यूदो, ईखलाख रसूल खा पठाण टॅग ऑफ वार, भाग्यश्री गोपाल मेश्राम यांचा सत्कार तसेच हॉकी, कबड्डी व नेटबॉल स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

           या क्रीडा पर्वाला यशस्वी करण्यासाठी प्रेम गावंडे अध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, अभिजित दुर्गे उपाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, अनिल ठाकरे सचिव ड्रीम चंद्रपूर, निलेश शेंडे कोशाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, रुपेशसींग चौहान सचिव हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, निखिल पोटदुखे सचिव दी नेटबॉल असोसिएशन चंद्रपूर जिल्हा, प्रा. विक्की पेटकर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, आकाश इंगळे, मनीष जयसल, महावीर यादव, सिद्धार्थ सूर्यवंशी, शुभम साखरे, शुभम पुणेकर, अमोल सदभैय्ये, पंकज सदभैय्ये, भारत विरुटकर, सोनाली गावंडे, आईशा शेख, प्रियंका मंडल, कोमल कुवर, कोमल चौधरी, दिक्षा चुनारकर, स्नेहा चुनारकर, श्रुती भरती, शर्वरी लाभणे, करिष्मा राजपूत आदिने परिश्रम घेतले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पोईनकर याने केले तर आभार प्रदर्शन अनिल ठाकरे यांनी केले.