पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पिरसाहेब बाबा (उदगीरबाबा) यांचा सोमवार पासून ऊरसाला प्रारंभ…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

           सालाबाद प्रमाणे गावचे ग्रामदैवत पिरसाहेब बाबा यांच्या ऊरसाला सुरुवात तर गावकरी व ग्रामस्थांच्या वतीने जयत तयारी. 

            पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील गावचे ग्रामदैवत पिरसाहेब साहेब बाबा (उदगीरबाबा) यांच्या उरसाला सोमवार एक ते बुधवार तीन एप्रिल दरम्यान होणार आहे. मुख्य उरसासह तमाशा व राज्यातील नामांकित मल्लांच्या कुस्त्यांच्या जंगी मुकाबलाने यात्रेची सांगता होणार आहे.

          इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्म सम भावाचे प्रतीक आसणारे पिरसाहेब बाबा यांचा सालाबाद नियम परंमपरे प्रमाणे उरूस होणार आहे. त्यामध्ये सोमवार 1 एप्रिल रोजी मानाच्या संदलच्या मिरवणुकीने बाबांच्या मजारवर संदल चढवण्यात येणार आहे.

          मंगळवार 2 मार्च रोजी मुख्य उर्जा निमित्त विविध स्टॉल साहित्य विक्रीची मोठी दुकाने आसल्याने मोठी यात्रा भरते. संध्याकाळी 9 वाजता मानाच्या घोड्याची मिरवणूक छबिना काढण्यात येतो. त्यानंतर प्रकाश आहेरेकर सह निलेश कुमार अहिरेकर यांच्या प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे. तसेच बुधवार 3 एप्रिल रोजी पुणे ,सोलापूर ,सांगली, कोल्हापूर,जिल्ह्यातील नामांकित मल्लांच्या कुस्त्याने यात्रेची सांगता होणार आहे.

             गावच्या परंपरे प्रमाणे पिरसाहेब यात्रेसाठी लोक वर्गणी गोळा करण्यात येते त्यातून पिरसाहेब बाबांच्या दर्ग्याची रंगरंगोटी गलब मजार वरील कापड तमाशा व कुस्त्यांसाठीही त्याचा खर्च करण्यात येत असतो.

            तसेच गावातील इतर यात्राही त्यातून पार पाडण्यात येतात. परंपरे प्रमाणे पिरसाहेब यात्रे निमित्त माहेरवाशीने आपल्या संपूर्ण कुटुंबीय सह बोललेले नवस फेडण्यासाठी तसेच पिरसाहेब यांना नैवेद्य नारळ फोडण्यासाठी येत आसतात त्यामुळे गाव यात्रे निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत आसते. पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे मानणारे भाविकही मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात.