RPI चा निळा झेंडा कांग्रेस उमेदवाराच्या गाडीतून हद्दपार होणार की काय ? :- मुनिश्वर बोरकर RPI जिल्हाध्यक्ष…

ऋषी सहारे

   संपादक

            गडचिरोली – इंडिआ आघाडी सोबत रिपब्लिकन पार्टी च्या प्रमुख चार गटापैकी एकही गट सोबत नसल्यामुळे रिपब्लिकन पार्टी चा निळा झेंडा कांग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

           रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख चार गटापैकी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन ( आठवले ) गट गेल्या १० वर्षापासुन भाजपा सोबत असल्यामुळे भाजपा उमेदवार डौलाने त्यांचा निळा झेंडा गाडीला लावताना दिसतात.

          वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दोन टर्म झाले आघाडीत घेतो म्हणुन कांग्रेस वंचितला हुलकावणी देत असल्यामुळे आता वंचित स्वतंत्रपणे उमेदवार उभे करीत आहे.

          वंचितचा निळा झेंडा सुद्धा कांग्रेस पासुन दुर गेलेला आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे चा पि.रि.पा.पक्ष मागील दहा वर्ष कांग्रेस सोबत होता परंतु कांग्रेसने कवाडे सरांना विधान परिषदेत हुलकावणी दिल्यामुळे दुखावलेले पिरिपा नेते या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेना महायुती सोबत गेल्यामुळे कांग्रेस पासुन पिरिपाचा निळा झेंडा दुर गेला.

            चौथा रिपब्लिकन पार्टीचा एक महत्वाचा गट त्याचे प्रमुख डॉ. राजेंद्र गवई इंडिआ आघाडीत राहु ईच्छित होते परंतु कांग्रेसने रिपाईला सुद्धा बाजुला सारल्यामुळे डॉ. राजेंद्र गवई यांचा डॉ. बाबासाहेब आबेडकर द्वारा स्थापित एकमेव मुळ रिपाई पक्ष सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुकीत उमेदवार उभे केल्यामुळे गवई गटाचा निळा झेंडा सुद्धा कांग्रेस पासुन दुर गेलेला दिसतो.

             म्हणजेच एकंदरीत आर. पि.आय. चे चार प्रमुख पक्ष व त्यांचे झेंडे कांग्रेस पासुन दुर जावून आहेत. देशातील तिसऱ्या नंबरचा प्रमुख पक्ष बसपा ला सुद्धा इंडिआ आघाडीत सामावून न घेतल्यामुळे बसपा चा हत्ती (निळा झेंडा ) सुद्धा कांग्रेस पासुन दुर आहे. अनेकांना वाटतो की आरपीआय मधे १७ गट आहेत. वरील चार प्रमुख गटाला सोडले तर इतर १३ गट ना तळ्यात ना मळ्यात आहेत. त्यांना ना कांग्रेस ना भाजपा विचारत नाही. असे अखील भारतीय , खोखो सारखे पक्ष आमचा मोठा पक्ष आहे आमचा कांग्रेसला पाठींबा आहे. असे ,ना घर का ना घाटका प्रमाणे रिपाईच्या १३ गटाला पाहिजे तेवढे कांग्रेसवाले विचारात घेत नाही.

              त्यामुळे अश्या पक्षाला कांग्रेसवाले , घे शिरणी राय गुपचुप करीत आहेत. भाजपा – शिवसेना पक्षांना हारवायचे असेल व इंडिआ आघाडीला मजबुत करावयाचे असेल तर महाराष्ट्रात कांग्रेसला रिपाई चा निळा झेंडाच मजबुत ठरु शकतो. परंतु कांग्रेसवाले रिपाइं ला महत्व देत नसल्यामुळे महाराष्ट्रात कांग्रेसचे स्वप्न भंग पावण्याची दाट शक्यता आहे.

            आरपीआय चे मोठे दोन पक्ष भाजपा सोबत गेलेत परंतु त्याचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आम्ही भाजपा पटत नसल्यामुळे कांग्रेस सोबत राहण्यास तयार आहेत. तरीही कांग्रेसवाले त्यांना विचारात घेतांना दिसत नाही. उमेदवार आपल्याच तोऱ्यात वावरतांना दिसतात. म्हणुनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कोणत्याही गटाला सोबत न ठेवून व निळा झेंडा सोबत न राहणे कांग्रेसला घातक ठरणार आहे हा येणारा काळच सांगेल. व कांग्रेसला वंचितही डोके दुखी ठरणार आहे.