दर्यापुरात खासदार इम्तियाज जलील ने विरोधकांवर डागली तोफ… — आनंदराज आंबेडकर यांना लोकसभेत पाठवा…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

         रिपब्लिकन सेनेचे संस्थापक, वंचित बहुजन आघाडी, ए आय एम आय पुरस्कृत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ मोमीन पुरा दर्यापूर येथे ए आय एम आय एम ची विशाल जाहीर सभा दि २३तारखेला संपन्न झाली.

          या जाहीर सभेमध्ये हजारोंच्या संख्येने ए आय एम आय एम व वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व नागरिक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, युवा पुरुष मोठे संख्येने उपस्थित होते.

          खासदार इम्तियाज जलील व आनंदराज आंबेडकर यांचे ढोल नगाऱ्याने गाज्या बाजाने थाटात स्वागत करण्यात आले.एमआयएम व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधकांवर टीका शस्त्र सोडताना नागरिकांना संबोधित करताना म्हणाले देशाचा पंतप्रधान हा संविधानिक पदावर असूनही रोजगार वर बोलत नाही., शिक्षण वर बोलत नाही, महागाई व शेतकऱ्या बद्दल बोलत नाही, फक्त धर्माची राजनीती करून देशाला व युवा पिढीला घुमरा करत आहे.

         एक विशेष समाजाबद्दल अभद्र भाषा बोलताना पंतप्रधान शोभत नाही, एम आय एम पक्षाला सर्व जातीय लोक – चालतात एम आय एम पक्ष हा सेक्युलर आहे परंतु दुसऱ्या पक्षाला आम्ही चालत नाही सेक्युलर मानसिकतेच्या लोकांची एमआयएम पक्षामध्ये नेहमी स्वागत आहे.

मुस्लिम व दलित समाजाला संबोधित करताना जलील म्हणाले की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आहे.म्हणून संविधानाची ताकद आपल्या मागे आहे कुणालाही घाबरता कामा नये. मुस्लिमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देऊन निवडूनआणले होते आणि लोकसभा मध्ये पाठविले होते.

         आता आमची पाळी आहे त्यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना भरघोस मतांनी निवडून आणून त्यांना लोकसभा मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना केले.

            खासदार नवनीत राणा वर टिका करताना जलील म्हणाले कि बॅरिस्टर असोद्दीन ओवीसी व मी त्यावेळी लोकसभा मध्ये हजर नव्हतो जेव्हा खासदार नवनीत राणा यांनी ओवैसीवर टिका केली. नाहीतर तिला तिची औकात दाखविली असती तशे हि जंगलात वाघाची संख्या कमी असत आणि दुसऱ्या जनावरांची संख्या जास्त असतो आम्ही दोन वाघच लोकसभेत काफी आहोत आणि तिसरा वाघ आनंदराज आंबेडकर यांना लोकसभेत पाठवायचा आहे.

           नवनीत राणावर टोला मारताना जलील म्हणाले सुशिक्षित आणि समजदार लोकांना सर्व जातीय पंथांना साथ घेऊन चालणाऱ्या लोकांना लोकसभेमध्ये पाठवा जातीयवादी लोकांना लोकसभेत पाठवू नका आनंदराज आंबेडकर हे निवडून आल्यावर अमरावतीत मोठा जल्लोष साजरा करून मताचे ध्रुवीकरण करणाऱ्या राजकारणींना दाखवून देऊ खासदार जलील ने सर्व दलित व मुस्लिम बांधवांना आनंदराज आंबेडकर यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले.

             यावेळी व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्राचे एमआयएमचे पदाधिकारी, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते. जय भीम जय मिम च्या जय घोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता.

           सदर वेळी इम्तियाज जलील यांनी गॅस सिलेंडर बटन क्रमांक पाच तमाम अमरावतीकरांना दाबण्याचे आवाहन केले आहे.यावेळी दर्यापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त होता.