आरमोरी, किटाळी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

 

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

       आरमोरी :- आरमोरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती दिवस संपन्न झाला. सर्व प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

         त्यानंतर विलासजी गोंदवले यांनी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ग्रंथावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाला प्रा. प्रशांत दोनाडकर, श्रीमती निलीमा निलकंठराव दोनाडकर, विलासजी गोंदोळे, रंजीत बनकर, युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, रक्तदान समिती चे चारुदत्त राऊत, रोहीत बावनकर, लिलाधर मेश्राम, आदी उपस्थित होते.

        आज दिनांक 6/05/2024 ग्रामपंचायत किटाळी येथे शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी किटाली ग्रामपंचायतचे सरपंच राजेश लिंगायत यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

         यावेळी पाणीपुरवठा कर्मचारी प्रीतम इलमलवार ,तुफान भोयर, संगणक परिचालक पोर्णिमा दुधबळे उपस्थित होते.