मागिल एक वर्षापासून बौद्धिक वर्ग सुरु… — समाजसेवक निलकंठ शेंडे आणि त्यांचे सहकारी करतात समाजप्रबोधनाचे नित्याने कार्य.. 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका   

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनायचे किमान आठवड्यातून एकदा तरी माणसाने विहारात गेले पाहिजे.

       त्यांच्या संकल्पनेतून समाजसेवक निलकंठ शेन्डे सर व त्याचे सहकारी यांनी पुढाकार घेत मागिल एक (१) वर्षापासून बुध्द विहारात बौद्धिक वर्ग सुरु केले.

         सुरुवातीचे काही काळ आम्रवन दिक्षाभूमी सुगत कुट्टी मालेवाडा येथे तर आता सम्बोंधी बुद्ध विहार चिमुर येथे दर रविवार सकाळी ९.०० ते ११.०० वाजता बौद्धिक वर्ग सुरु आहे. 

        त्यात मागिल एक (१) वर्षात बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचन झालेले आहे.

          आजपासून भारताचे संविधान ह्या ग्रंथाचे वाचन सुरू केलेले आहे. 

       त्या संदर्भात पहिल्यादांच टीपलेले छायाचित्र.तरी सर्वानी येणाऱ्या पुढील रविवारी ह्या बौध्दीक वर्गाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन,समाजसेवक निलकंठ शेंडे,भागवत बोरकर व इतर सहकार्यांनी केले आहे.