कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची शिस्तबद्द रणनिती वाढवित आहे, अशोक नेतेंची डोकेदुखी…

        पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा

            दखल न्यूज भारत

देसाईगंज :-

      गडचिरोली चिमुर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस चे तथा इंडिया आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी २७ तारखेला आपला नामांकन अर्ज दाखल केला.

         यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचेसह इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षाचे जिल्ह्यातिल पदाधिकाऱ्यांनसह तब्बल १५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते २६ तारखेला भाजप चे विद्यमान खासदार अशोक नेते यांनी नामांकन अर्ज सादर करतांना उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आञाम यांचेसह आजी-माजी मंत्री आमदार खासदारांचा दोन डझन पेक्षा जास्त नेते मंडळी उपस्थित होते.

          मात्र ३ हजार पेक्षाही कमी कार्यकर्ते उपस्थित असतांना झालेली गैरसोय हा कार्यकर्त्यांच्या नाराजी चा विषय बनला असुन कॉंग्रेसचे शिस्तबद्द नियोजन ही अशोक नेतेंची डोकेदुखी बनली आहे.

       भाजप ची तिकिट अशोक नेतेला की कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना या चर्चेने संपुर्ण जिल्ह्याचे वातावरण तापले असतांना भाजप कार्यकर्त्यांनी अशोक नेतेंनाच तिकिट मिळावी यासाठी भरपुर प्रयत्न केले. बराच खटाटोप केल्या नंतर पक्ष श्रेष्ठींनी अशोक नेतेंची उमेदवारी निश्चित केली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन म्हणून भाजप नेतेमंडळींनी जमवाजमव करत संपुर्ण लोकसभा क्षेञातुन जेमतेम ३ हजार च्या जवळपास कार्यकर्त्यांची फौज जमा केली.

    नामांकन अर्ज सादर करण्यासाठी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हेलिकॉफ्टर ने गडचिरोली च्या पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या हेलिपैड वर येणार ही माहिती मिळताच भाजपचे सर्वच सुभेदार हातात गुलदस्ते घेवुन सकाळी ११ वाजता पासुनच तळ ठोकुन बसले होते तर दुसरीकडे स्व:ता उमेदवार असलेले अशोक नेते हे सकाळपासुनच मार्कंडा देवस्थानात पुजापाठ करत बसले होते.

           दुपारी २ वाजता देवेंद्र फडणवीस हेलीकॉफ्टरने गडचिरोली ला दाखल झाले. या कालावधित सकाळपासुन आलेले कार्यकर्ते भुकेने व तहानेने व्याकुळ झाले होते पण भाजप चे जिल्ह्यातिल सर्वच सुभेदार केवळ दिग्गज नेत्यांची आवभगत करण्यातच व्यस्त होते. अखेर कार्यकर्त्यांचा संयम तुटलाच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाषन करत असतांना कार्यकर्ते उठुन उभे झाले आणि सरळ प्रश्न करु लागले, साहेब तुम्ही नंतर बोला पण किमान पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था करता का? तेव्हा बावनकुळेंनी सावरा सावर करत पानीच नाही तर मसाला भाताची ही व्यवस्था केली आहे. म्हणत वेळ मारुन नेली. 

       दुसऱ्या दिवशी इंडिया आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या उमेदवारीचे खरे सुत्रधार विजय वडेट्टीवार यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतिने व्युह रचना तयार केली कॉंग्रेसच्या सर्वच सुभेदारांना आपआपल्या क्षेत्रातुन आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्यांची गैरसोय होता कामा नये.अशी ताकिद देताच सर्वच सुभेदार कामाला लागले माजी खासदार मारोतराव कोवासे, शिवसेनेचे सुरेन्द्रसिंग चंदेल, रिपाचे रोहिदास राऊत, समाजवादी पक्षाचे इलियास खान पठान, क्यमुनिस्ट पक्षाचे चे डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, आपचे प्रकाश जिवानी यांचेसह इंडीया आघाडीच्या सर्वच सुभेदारांनी तब्बल १५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमा करत वज्रमुठ ताकदवर असल्याचे शक्तिप्रदर्शन केले.

     सद्या आरमोरी विधानसभा क्षेञात शेतकऱ्यांचे आंदोलन करुन सरकारला जेरिस आणणारे रामदास मसराम आपले निकटवर्ती कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेवुन परसरामजी टिकले व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार स्व:ता पिण्याच्या पाण्याचे नियोजन सांभाळत होते.

          १५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.सर्वांना मसाला भात मिळाला पाहिजे यासाठी कॉंग्रेससह घटक पक्षाचे सर्वच नेते कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते तर दुसरीकडे ३ हजार पेक्षा ही कमी कार्यकर्त्यांना साधे पिण्याचे पाणि विचारण्याची तसदी ही भाजपचे शिलेदार न घेता केवळ वरिष्ठ नेत्यांची आवभगत करण्यातच मग्न असल्याचे चिञ उघड्या डोळ्यांनी पहावयास मिळत होते.

            विजय वडेट्टीवार यांनी डॉ. किरसान यांच्या विजयाचा निर्धार पक्का केला असुन रिपा-सपा शिवसेना, क्यमुनिस्ट, आप इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्ष जोमाने कामाला लागले असुन तब्बल १० वर्षे खासदार राहुनही भाजप च्याच कार्यकर्त्यांशी मनमिळावुपणा न बाळगल्याने अशोक नेते मोदींच्या नावाचा सहारा घेवुन निवडनुकीत किती तग धरतात हा येणारा काळच सांगेल.