ननंद भावजयांच्या प्रतिष्ठा पणाच्या लढतीत सुनेत्रा पवार यांचे पारडे जड…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठा पणाला ननंद भावजयच्या लढतीत सुनेत्रा पवार यांचे पार्ड जड. येणाऱ्या 7 मेला बारामती लोकसभेचे मतदान आसल्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे.

           उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीत स्वतः विद्यमान आमदार आसल्यामुळे पुन्हा मतदारांचा कौल त्यांच्याच बाजूने आसणार आहे याची काही शंका नाही.

          तसेच इंदापूर मधून आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची एक जूट झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची ताकद जास्त वाढल्याने सुनेत्रा ताई पवार यांना अधिक मतदान वाढणार तर दौंड तालुक्यामधून विद्यमान आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचीही साथ आसल्यामुळे त्याही ठिकाणी अजित दादा पवार गटाला मतदारांची मदत जास्त प्रमाणात वाढणार आहे.

          खडकवासलातून सुप्रियाताई सुळे यांचा शहरी भाग वगळला जातो तर भोरमधून सुप्रिया ताईच्या विरोधात गट आसल्यामुळे त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी पवार यांचे वातावरण चांगले निर्माण झालेले आहेत. प्रत्येक तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते अजित दादा पवार गटामध्ये पक्ष पवेश करीत आहेत. अजित दादा पवार यांना एकीकडे महाराष्ट्र राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची आसल्यामुळे मतदारांचा कौल वाढू लागला आहे.

            प्रत्येक गावोगावी 70 टक्के मतदान हे सुनेत्रा वहिनी पवार यांना होणार आसल्याचे चित्र दिसू लागले आहे. अजित दादा पवार यांचे काम गरिब कार्यकर्त्यांना समजून सांगणे, आलेल्या अडचणी दूर करणे, एखाद्या व्यक्तीला पडलेले संकट त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळणे, एखाद्याचे काम करूनच दाखवणे, एखाद्या आमदारला पाडतो म्हणून पाडून दाखवायची हिम्मत असणे, हीच ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाची पावती आहे. सुनेत्रा वहिनी पवार या टेक्साटाईंलच्या अध्यक्ष आसल्यामुळे आनेक महिला रोजगारांना रोजगारांची निर्मिती करून दिली, प्रापंचिक सात दिल्यामुळे मतदार राजा व महिला भगिनी यांचा कौल हा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या बाजूनेच आसणार आहे याची काही शंकाच नाही.