राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज :- काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता वडसा – अर्जुनी मार्गाची झालेली दूरावस्था व याचा दूरूस्ती कडे संबंधित विभाग व प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याचा निषेधार्थ आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात वडसा – अर्जुनी टि पाँइंट येथे शासनाविरोधात मोठी घोषणाबाजी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
काही वेळाने सर्व आंदोलकाना देसाईगंज पोलीसांनी ताब्यात घेत त्यांना स्थानाबद्ध केले सदर रस्त्याची दूरूस्ती कार्यवाही करीता शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देत कामाला सुरुवात न केल्यास भविष्यात अधिक तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात आमदार रामदास मसराम, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बूल्ले, माजी प स सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, यूवा नेते इलियास पठाण, धनपाल मिसार, नगरसेवक तथा कांग्रेस गटनेता विकास प्रधान ,नगर सेवक शाम ऊईके,नगरसेविका गुरमित कौर चावला, नगरसेविका मंदा समर्थ ,नगरसेविका राधीका पत्रे , नगर सेविका आशा दहिवले,फैमिदा पठाण,आनंदसींग चावला,विलास बंसोड,प्रकाश समर्थ, कमलेश बारस्कर,सागर वाढई, परशूराम ठाकरे,दिलीप घोडाम, जयमाला पेन्दाम,रूपेश टिकले ,राधेश्याम पत्रे, शरीफ शेख, बबलू शेख, सादिक शेख, गिरीधर नैताम, शंकर राऊत ,पवन गेडाम,हन्सराज लांडगे,गजानन घरत व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.पोलिस प्रशासनाचे पो.नी.जगताप यांचे मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



