लक्षवेधी
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथील नागरिक नळयोजनांतंर्गत पाणी पुरवठ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.पण,तेथील नागरिकांना कधी नळयोजना नादुरुस्तिचा फटका बसतो तर कधी विद्युत कनेक्शनचा फटका बसतो आहे.
आठ दिवसांच्या कालावधीनंतर २ दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा मौजा शिवणपायली येथील नागरिकांना नळयोजनांतंर्गत करण्यात आलाय.
परंतु आता विद्युत जोडणी ने दगा दिला असून दोन दिवस मौजा शिवणपायली येथील नागरिकांना पाणी पुरवठा होणार नसल्याचे सांगितले जाते.
शिरपूर गटग्रामपंचायतचे ग्रामसेवक भसारकर यांनी नळयोजनांतंर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपची विद्युत जोडणी योग्य करून घ्यावी व मौजा शिवणपायली येथील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी,या अपेक्षेत मौजा शिवणपायली येथील महिलापुरुष आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर गढूळ पाण्यामुळे मौजा शिवणपायली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही,याबाबत काळजी घेणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे,ग्रामसेवकांचे, पाणि पुरवठा विभागाच्या अभियंत्यांचे आद्य कर्तव्य आहे.



