Home कृषी तालुकास्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२५ : पाच शेतकरी विजेते…

तालुकास्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२५ : पाच शेतकरी विजेते…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाला. स्पर्धेत तालुक्यातील पाच प्रयोगशील शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादन व पीक व्यवस्थापनाच्या जोरावर यश मिळविले.अशी माहिती आज रविवार रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तालुका कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

विजेते शेतकरी सर्वसाधारण गट…

प्रथम – घनश्याम कांबळी (चांदागड) ₹५ हजार, द्वितीय – आबाजी गंगाधर बावनथडे (शिरपूर) ₹३ हजार

आदिवासी गट…

प्रथम – गजानन नारनवरे (भगवानपूर) ₹५ हजार, द्वितीय – विनायक इस्कापे (कुंभिटोला) ₹३ हजार, तृतीय – लक्ष्मीबाई बोरघरे (चांदागड) ₹२ हजार.

           विजेत्या शेतकऱ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असून त्यांच्या यशामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.