Home Political कुरखेडा नगर पंचायत पोटनिवडणूक 2026 : प्रभाग क्र.16 मध्ये भाजप-काँग्रेस आमनेसामने बाजी...

कुरखेडा नगर पंचायत पोटनिवडणूक 2026 : प्रभाग क्र.16 मध्ये भाजप-काँग्रेस आमनेसामने बाजी मतदारांच्या हातात….

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         कुरखेडा नगर पंचायत पोटनिवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 (अनुसूचित जमाती महिला आरक्षित) मध्ये थेट भाजप आणि काँग्रेस यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीनुसार दोन उमेदवार रिंगणात आहेत.

        कांग्रेस च्या प्रतिभा रवी उईके यांना ‘हाथ’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून भाजपाच्या निलिमा जयराम हरामी यांना ‘कमळ ‘ हे चिन्ह मिळाले आहे. या अगोदर या प्रभागात नवख्या भाजप उमेदवार गौरी ऊईके यानी माजी नगराध्यक्षा आशा तुलावी यांचे वर अतिशय अल्प मताच्या फरकने विजय प्राप्त केला होता.

        यामुळे प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणूक थेट दोन प्रमुख पक्षांमध्ये होत असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि पक्षांची ताकद यावर ही निवडणूक अवलंबून राहणार असून अंतिम निकालासाठी मतदारांचा निर्णयच निर्णायक ठरणार आहे.

         आता प्रभाग 16 मध्ये “कमळ की हात?” याचा फैसला मतदारांच्या मतदान पेटीतून होणार आहे.