Home Maharashtra विविध योजनांचा जमा आणि खर्च झालेल्या निधींचा विल्हेवाट सरपंच आणि ग्रामसेवकच करतात?…

विविध योजनांचा जमा आणि खर्च झालेल्या निधींचा विल्हेवाट सरपंच आणि ग्रामसेवकच करतात?…

     वृत्तवेध

  उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

            तथा

   ग्रामपंचायत सदस्य…

         १४-१५ वित्त आयोगासह इतर सर्व योजनांचा,”गाव विकासासाठी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होणारा निधी हा मासीक सभेमध्ये सविस्तर चर्चेला येत नसल्याने,ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजना अंतर्गत किती रुपयांचा निधी ग्रामपंचायतला प्राप्त झाला आणि कोणत्या कामासाठी तो निधी शासनाने दिला हे माहितच राहातं नसल्याचे विदारक सत्य आहे.

            यामुळे विविध योजनांतर्गत दरवर्षी ग्रामपंचायतींना विकासकांसाठी प्राप्त झालेला लाखो रुपयांच्या निधीचा विल्हेवाट श सरपंच आणि ग्रामसेवकच परस्पर करतात असे महाभ्रष्ट्राचारांचे गंभीर वास्तव आहे.

      विकास कामांसाठी विविध योजनांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये जमा झालेला निधी ग्रामपंचायत सदस्यांना माहिती राहातं नसल्याने त्या निधींच्या खर्चाचा हिशोब ग्रापपंचायतच्या मासीक सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नाही.

        याचबरोबर झालेली कामे कंत्राट पध्दतीने करण्यात आली की,ग्रामपंचायतने स्वत: केलीत,हे सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना माहिती राहात नाही.

        मात्र,गाव विकासासाठी ग्रामपंचायतींच्या विविध खात्यावर जमा झालेला लाखो रुपयांचा निधी शिल्लक दिसत नाही,किंवा प्राप्त निधी कुठे खर्च केला गेला हे सुद्धा कल्पनेच्या पलीकडेचे ठरत असल्याने,”सरपंच आणि ग्रामसेवक,हे बॅंक खात्यातून पाहिजे तेव्हा परस्पर निधी काढतात आणि खर्च करीत असल्याचा,दाट संशय बऱ्याच ग्रामपंचायतच्या सदस्यांना आहे.

       तद्वतच लेखापरीक्षक हे ग्रामपंचायत जमाखर्चाचे अचूक लेखापरीक्षण करुन सरपंच आणि ग्रामसेवकांना वाचवित असल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हे अस्वस्थ झाले आहेत.

      सरपंच आणि ग्रामसेवकांच्या एकाधिकारशाही मुळे अनेक गावांचा विकास खुंटला असून,”गाव विकासासाठी ग्रामपंचायतींच्या बॅंक खात्यात प्राप्त निधींची सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून अफरातफर केली जात असल्याचे नाकारता येत नाही.