Home Social “उत्कृष्ट समाजसेवक सन्मानाने,शुभम पसारकर सन्मानित… — विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र...

“उत्कृष्ट समाजसेवक सन्मानाने,शुभम पसारकर सन्मानित… — विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्या कडून पत्राद्वारे सन्मानित!

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

     महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले संदीप पाटील (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक,नागपूर परिक्षेत्र नागपूर यांनी,शुभम राजु पसारकर यांना पत्र पाठवले असून,”त्यांना उत्कृष्ट समाजसेवक,म्हणून पत्राद्वारे सन्मानित केले आहे.

        पत्राची सुरुवात,प्रिय शुभम सन्मानपत्र ” उत्कृष्ठ समाजसेवक “अशा शब्दांनी केली आहे.

        पुढे पत्रात म्हटले आहे की,श्री.शुभम राजु पसारकर,अध्यक्ष दिव्यवंदना आधार फाउंडेशन चिमुर,जि. चंद्रपूर,आपण चंद्रपूर,भंडारा व नागपूर ग्रामीण येथील रोडवरील बेघर,बेवारस भीक्षेकरी,निराधार,अनाथ व वयोवृध्द तसेच मनोरुग्णांना आपुलकीने आधार देणे,त्यांचे वैद्यकीय उपचार करणे,त्यांचे विस्कटलेले केस व दाढी स्वतः करुन देणे,संबंधीतांच्या परीवारांचा शोध घेवुन त्यांच्या परीवारांची भेट करुन देणे,तसेच त्यांना रोजगारास मदत करणे व समाजामध्ये स्वाभिमानाने जगण्यास मदत करुन स्वतः स्वावलंबी होणेस सर्वोतोपरी मदत करीत आहात.

       पण,उत्कृष्ट समाजसेवा या भावनेने अनाथ गरजु लोकांना,तसेच वृध्दांना स्वतःच्या आश्रमामध्ये कायमस्वरुपी आपण आधार देत आहात.आतापर्यत आपण दिव्यवंदना आधार फाउंडेशन तर्फे एकुण ५००० गरजु लोकांना आधार दिलेला आहे.

        याप्रकारे आपण निस्वार्थ समाजसेवा नियमीत करीत आहात,आपल्या सारख्या समाजसेवकांची समाजाला अत्यंत गरज आहे.

       समाजकार्यातील आंपल्या योगदानाबद्दल चंद्रपूर,भंडारा व नागपूर ग्रामीण या जिल्ह्यातील “उत्कृष्ट समाजसेवक,म्हणुन आपणास सन्मानीत करीत आहोत.”

      आपण पुढील भविष्यात अशा प्रकारे समाजकार्यात निरंतर अग्रेसर राहुन महाराष्ट्र पोलीस दलातर्फे बांधिलकी निर्माण करण्याचे उपक्रमात निरंतर मदत करीत राहाल याचा आम्हास खात्रीपूर्वक विश्वास आहे असे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

       तद्वतच त्यांनी पुढील काराकिर्दीसाठी शुभम पसारकर यांना मनःपूर्वक हार्दीक सुभेच्छा !