शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
कामापूरता वापर करणारी माणसीकता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजली आहे.सामाजिक चळवळी अंतर्गत सामाजिक कार्य करताना गांभीर्याने विचार करुन कार्य करा असे आषीश बोरकर म्हणाले.
वेळेचे भान न ठेवता काम केल्यास तुम्हचे भविष्य धोक्यात आहे.जो नेता आपल्या मदतीला धावून येतो तोच खरा आपला असतो,अन्यथा वापर करा आणि फेकून द्या अशा नेत्यांची कींमत कालांतराने शून्य होत असते असेही ते म्हणाले.
गूरूत्वकर्षनाचा नियम आहे,ज्या वेगाने चेंडू वर फेकल्या जाते त्याच वेगाने चेंडू जमीनीवर येत असतो.म्हणून माझ्यासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या मित्रांनो आपला वेळ अमूल्य आहे,वेळेच भान ठेवून काम करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता आशिष बोरकर.यांनी युवकांना केले.



