Home देशविदेश ओ.बी.सी.तथा शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ….

ओ.बी.सी.तथा शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ….

     लेखक

प्रा.देवानंद‌ पाटील…

    कोण म्हणतयं बाबासाहेबच दलितांचे पुढारी होते,संविधान निर्माता केवळ एका जातीपुरता मर्यादित राहू शकत नाही,तरी धुर्त लोकं बाबासाहेबांना जात विचारली तेव्हा ते म्हणतं ‘आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन’!

       ते ओ.बी.सी.चे नेते होते तथा कैवारी होते. ‘हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ लिहून ओ.बी.सी.मध्ये जागॄती निर्माण केली,३५० कलम घटनेत समाविष्ट करून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या ओ.बी.सी.चा अभ्यास करण्यासाठी,त्यांच्या सुधारणेसाठी व उपाय योजणेसाठी आयोग स्थापन करावा असा आग्रह धरला. 

       या कलमामुळेच ‘मंडल कमीशन’ चा मार्ग मोकळा झाला.संविधान लिहिताना -डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम आरक्षणाचा मुद्दा मांडला,ओ.बी.सी.समाजाचा विचार केला.

      ओ.बी.सी.आरक्षणाचे कलम ३५०, एस.सी. 341,एसटी 342 कलम घातले. 340 कलमाला प्रचंड विरोध झाला,कोण हे ओ.बी.सी. ‘खुद्द वल्लभभाई पटेल म्ह‌णाले.महात्मा गांधी,पं.नेहरु,डॉ. राजेन्द्रप्रसाद नाराज झाले. उच्चवर्णियांनी याला विरोध केला. 

      डॉ.बाबासाहेबानी ओ. बि.सी.कसे मागास आहेत ते प्रचंड अभ्यास,शोधवृत्ती जोपासून संसदेत पटवून दिले.स्त्रियांना मनुवादी विचारातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मान- सन्मान मिळवून देण्यासाठी,त्यांच्या सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी संसदेत ‘हिंदू कोड बिल’ मांडले.

      परंतु स्त्रीयांच्या विषयी प्रचंड उदासिन असलेल्या सरकारने हे विधेयक संसदेत संमत होवू दिले नाही,याचाच परिणाम म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.

         डॉ.बाबासाहेब केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हते तर प्रगल्भ अर्थतज्ञ शेतकऱ्यांचे कैवारी होते. 

       छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा यांनी पुढे नेला.भारतात जलसिंचन बहुद्देशिय प्रकल्प ही संकल्पना सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली.दामोदर नदी प्रकल्प आणि देशातील पंधरा मोठ्या धरणांची ब्ल्युप्रिंट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली.

        १९२९ कोकण प्रांतात खोरी पद्धतीचा विरोध करण्यासाठी चिपळूण येथे आंदोलन केले.शेती केवळ उपजिविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचे साथन आहे.उत्पाद‌कता वाढविण्यासाठी सामुहिक शेतीचा वापर करावा.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढे दिले.’कोकण प्रांत शेतीसंघ’ स्थापन केला.

       शेतीसाठी विज उत्पादित करावी यावर भर दिला.आधुनिक शेतीवर भर दिला.शेतीला अद्योगाचा दर्जा द्यावा,भांडवल द्यावे.कर्ज सुट द्यावी.अवजारे द्यावे अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 

      किमान वेतन कायदा, महीला-पुरुषांना समान वेतन.आठ तास काम,महिलांना प्रसूती रजा,विम्याची सोय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मजुरमंत्री असतांना केली.म्हणूनच ते शेतकरी – मजुरांचे कैवारी होते.

      संकलन

विद्रोही अविनाश गोंडाणे 

अमरावती ९९२३२६४१९३…