Home देशविदेश संविधान आमुचे जीव की प्राण…

संविधान आमुचे जीव की प्राण…

   कवी

   सु द तु

    भांडवलशाही ने आम्हास पिळले,ब्राम्हणशाहीने आम्हास छळले…

    करुनी निर्माण,वर्ग अन जात,नष्ट करण्या ही विषमता

आम्ही मांडिले ठाण….

   संविधान आमचा जीव की प्राण — ०१

       स्वप्न आमच्या संतांचे,ध्येय आमुच्या महामानवांचे

संकल्प….

       आमुच्या महात्म्यांचे

पूर्ण करण्या करू आम्ही 

जिवाचे रान…..

   संविधान आमचे जीव की प्राण — ०२

     आम्ही भारताचे सार्वभौम लोक,सार्वभौम आमचे राष्ट्र,स्वातंत्र्याची हमी देते आम्हाला….

      हे आमचे संविधान

आमचे जीव की प्राण — ०३

    का सकलजन हितकारी,समतावादी

जीविताची आणि स्वातंत्र्याची हमी….

      गुलामीतून मुक्ती देणारे

  सर्वधर्म समभाव मानणारे

 चिकित्सक,विज्ञानवादी…..

        आमचे संविधान

म्हणजे आमुचे जीव की प्राण — ०४

      समानसंधी,समानप्रतिष्ठा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे,

समतावादी,मानवतावादी, विद्याननिष्ठ,पर्यावरणवादी

सर्व पक्षी प्राणी वृक्ष 

यावर दया करणारे

संविधान,आमचा जीव की प्राण — ०५

      सर्व धर्म आणि संस्कृतीचा

आदर करणारे,आराधनाचे स्वातंत्र्य देणारे,भाषा,क्षेत्र,लिंग,धर्म यात

भेदभाव न करणारे,अस्पृश्यता न मानणारे आमचे संविधान म्हणजे

आमचा जीव की प्राण — ०६

             कवी – सु द तु…