Home Political पळसगाव (पी.) ग्रामसभेमध्ये ठरले प्रभागनिहाय आरक्षण… — महिला राज येणार…

पळसगाव (पी.) ग्रामसभेमध्ये ठरले प्रभागनिहाय आरक्षण… — महिला राज येणार…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

   चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पि) येथे गुरुवारी (११ जून) दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. 

      तीन प्रभागांतून एकूण नऊ सदस्यांची निवड होणार आहे.आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती महिला,सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण जागा राखीव करण्यात आल्या.

      याचबरोबर प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जमाती महिला,सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा राखीव करण्यात आल्या.

       ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण बघता येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पळसगाव (पी.) ग्रामपंचायत मध्ये महिला राज प्रारंभ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.