संविधानानी दिलेल्या मानवतेचा धर्म जपावा – भदंत खेम धम्मो महाथेरो

अमरावती जिल्हा प्रतिनीधी

 कामठा (बु.) दि. २७.(वार्ताहर) :आई-वडिलांनी आपल्या मुलावर योग्य ते संस्कार करावे तर मुलांनी आपल्या जन्मदात्यांना सन्मानाने वागणूक देऊन सांभाळ करावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मातील पंचशील याचे पालन केल्यास मानवाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी संविधानाने दिलेल्या मानवतेचा धर्म जपावा. असे प्रतिपादन भदंत खेम धम्मो महाथेरो यांनी केले.

 अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील नालंदा बुद्ध विहार येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळ व गावकरी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भदंत खेम धम्मो महाथेरो यांनी आपल्या प्रवचनात उपदेश केला.

     यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. दुर्गा विश्वनाथ दासे हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बि. आर. कदम, माधव जमदाडे, पप्पू पाटील कोंढेकर, रमेश मानवते, आर. डी. जिल्हावार, शिवलिंग स्वामी, देवेंद्रसिंघ कामठेकर, सतिश व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. 

      सर्व प्रथम नवदिपसिंघ कामठेकर, हरजिंदरसिंघ कामठेकर, शंकर कंगारे व चंदबशी दासे यांच्या हस्ते सकाळी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

    दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे व्याख्याते डॉ. राम वाघमारे यांनी बाबासाहेब कोणाचे? या विषयावर विचार मांडले तर प्रा. विश्वनाथ दासे, डॉ. विनोद जाधव, शंकर कंगारे, प्रा. योगिराज वाघमारे , पप्पू पाटील कोंढेकर, बी आर कदम, प्रा. विश्वनाथ दासे, झाडे, हाजेंद्रसिंघ कामठेकर, ग्राम पंचायत सदस्या सौ. राधिका संजय गव्हाणे, शिल्पा सिध्दार्थ गव्हाणे, प्रा. राजेश पंडित सर यांची समयोचित भाषणे झाली.

    या वेळी गौतम सरोदे यांनी मनाला स्पर्श करणारे भीम गीत गायले तर चिमुकल्यांनी उत्कृष्ट लेझीम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. 

      दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जयंतीनिमित्त डॉ. विनोद जाधव यांनी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

      सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यामध्ये सर्व जाती धर्मातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मिरवणूक शांततेत पार पडली.     

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष जीवन गव्हाणे, उपाध्यक्ष धम्मपाल गव्हाणे, सचिव रंगनाथ गव्हाणे, सह सचिव रवी वैराट, कोषाध्यक्ष प्रकाश गव्हाणे, सहकोषाध्यक्ष पंकज गव्हाणे, रवीकिरण कसबे,अरविंद गव्हाणे सर, पप्पू कसबे, जनार्दन गव्हाणे, सुदाम गव्हाणे, चंद्रकांत गव्हाणे, चांदु कदम, रमेश निकम, रामदास साखरे, साईनाथ रावले,माधव कांबळे (फोटो ग्राफर), तुषार सरोदे, हर्षद कदम, श्रीपती गव्हाणे, संजय आस्वरे आदी युवकांनी अथक परिश्रम घेतले. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच दिनेश गव्हाणे यांनी मानले.

        या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, बाल-बालिका, नव युवक व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.