सतीनदी वरील नविन पूलाचे बांधकाम रखडले… — पावसाळ्यात ग्रामस्थांचा तालूका मूख्यालयाशी संपर्क तूटणार? 

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

      कुरखेडा तालूक्यात सद्या ब्रम्हपूरी ते देवरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सूरू आहे.या अंतर्गत शहरा लगत असलेल्या सतीनदीवरील जूना मात्र व्यवस्थीत असलेल्या पूलाला तोडत राष्ट्रीय महामार्गाचा अनूकूल असलेल्या मोठ्या पूलाचा बांधकामाला सूरवात करण्यात आली होती. मात्र सदर पूलाचे बांधकाम तांत्रिक अडचणी मूळे मागील एक महिण्यापासून बंद पडल्याने पावसाळ्यात या मार्गावरून आवागमन करणाऱ्या गावकऱ्यांना अडचण निर्माण होत तालूका मूख्यालयाशी संपर्क तूटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

        नागपूर ते रायपुर या राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येणार्या ब्रम्हपूरी, देसाईगंज कूरखेडा कोरची ते देवरी या मार्गाचे रूंदीकरण तसेच मार्गादरम्यान येणाऱ्या पूलांची क्षमता वृद्धि करीता उंचीकरण व रूंदीकरणाकरीता नविन पूलांचे बांधकाम करण्यात येत आहे.या अंतर्गत कूरखेडा येथील सतीनदीवर असलेला कमी उंचीचा मात्र मजबूत असलेल्या जून्या पूलाला तोडत नविन पूलाचा बांधकामाला दोन महिण्यापूर्वी सूरवात करण्यात आली होती पोकलेन व जेसीबी चा मदतीने नविन पूलाचा पायव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमूळे मागील एक महिण्यापासून पूढील बांधकाम रखडल्याने या मार्गावरून पावसाळ्यात आवागमन सूरू राहील की नाही शंका निर्माण झाली आहे.

           पावसाळा सूरू होण्याकरीता जवळपास दोन महिण्याचा कालावधी शिल्लक आहे. सद्या आवागमनाकरीता तोडण्यात आलेल्या जूना पूलाचा बाजूने कच्चा रपटा तयार करण्यात आला आहे. मात्र हा रपटा पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाला थोपविणे शक्य नाही त्यामूळे पावसाळ्या पूर्वी बांधकाम पूर्ण न झाल्यास या मार्गावरील आवागमन बंद पडेल अशी शंका निर्माण झाली आहे.या मार्गावरून कोरची,मालेवाडा, कढोली या प्रमूख मार्गावरील अनेक खेडेगांव जोडलेली जवळपास‌ असलेल्या अनेक खेडेगावातील विद्यार्थी शिक्षणाकरीता,रूग्न उपचाराकरीता तर ग्रामस्त बाजारपेठेत खरेदी करीता व शाशकीय कार्यालयात कार्यालयीन कामाने येत असतात.

           तसेच अनेक शासकीय कर्मचारी तालूका मूख्यालयी राहत सेवा देण्याकरीता ग्रामीण भागात दररोज या मार्गावरून आवागमन करतात या रखडलेल्या पूलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास सर्वांची अडचण होणार आहे. इतर पर्यायी मार्ग लांबचे व त्रासदायक असल्याने यांचा पावसाळ्यात तालूका मूख्यालयाशी संपर्कच तूटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने या रखडलेल्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरीकाकडून करण्यात येत आहे.