खेळातील सहभागामुळे सर्वांगीण विकास होतो :- डॉ. सोमदत्त करंजेकर…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आंतर महाविद्यालयीन क्रिकेट झोन वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील भव्य मैदानावर पार पडले. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद जी करंजेकर आणि नागपूर विदयापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

          उद्घाटन समारंभ प्रसंगी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थाचे अध्यक्ष डॉ.सोमदत करंजकर यांनी आपल्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, खेळातील सहभागामुळे खेळाडूंचा विकास होण्यास मदत होते. सर्वांगीण विकास होतो. खेळाडूंना जीवनात काहीतरी नवीन आणि चांगले करण्याची प्रेरणा मिळते; त्यांना अनुभव, आत्म-नियंत्रण आणि एकत्र काम करण्याची प्रेरणा मिळते.

             यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनीही स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाडूंचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. स्पर्धा प्रमुख र्डॉ.जितेद्र कुमार ठाकूर, पंच म्हणून डॉ. संजय आगाशे, डॉ.नरेश बोरकर, क्रीडासंघटक शाहिद कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठ अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

            प्रा.निरज अतकरी , देवेंद्र इसापूरे डॉ. राजश्री, श्री पुखराज लाजेवार, शाहीद सैय्यद यांनी स्पधेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. रवी मुगुंलमारे, आशोक मीणा, भीम सिंग मीना, विक्रम मीना, विवेक मीना, अंकीत मीना,आदींनी सहकार्य केले.

        त्यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.