सेंद्रिय शेती भविष्यात शाश्वत शेतीचे मॉडेल बनेल.- अनिल किरणापुरे. — साकोली तालुका कृषी विकास उत्पादक कंपनी अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रम व सेंद्रीय शेती मार्गदर्शन कार्यक्रमाचे औचित्य.. 

संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

        साकोली- सानगडी ग्रामपंचायत सहानगड सभागृहामध्ये पंजाबराव देशमुख परपंरागंत जैविक कृषी मिशन अंतर्गत आत्मा प्रकल्प संचालक भंडारा व साकोली तालुका कृषी विकास उत्पादक कंपनी लिमिटेड साकोली अंतर्गत प्रकल्प निविष्ठा वाटप व जनजागृती कार्यक्रम या अंतर्गत एक दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

     यात सदर प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जय किसान सेंद्रिय शेतकरी बचत गट सानगडी या गटातील शेतकरी उपस्थित होती. यावेळी कंपनी अंतर्गत राबवण्यात येणारे प्रकल्प बाबत शेतकऱ्यानं माहिती देण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी अनिल किरणापुरे म्हणाले की सेंद्रिय शेती ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांनाच कळते. सध्याच्या व्यवसायाभिमुख शेती पद्धतीमुळे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, रासायनिक बुरशीनाशके (Chemical fertilizers, pesticides, chemical fungicides) आणि तणनाशकांचा प्रसार वाढला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रश्न जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहे. सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या विविध तत्त्वांवर आधारित आहे. या पद्धतीत, तत्सम कृषी उत्पादनांवर आधारित उद्योगांमधून उत्पादित होणारी सेंद्रिय सामग्री शक्य तितक्या कार्यक्षमतेने वापरली जाते, शक्य असल्यास रासायनिक खतांचा वापर कमी करणे किंवा टाळणे. त्यासाठी शेतात किंवा शेताबाहेरील कचरा, जनावरांचे मलमूत्र, अवशेष इत्यादींचे विघटन करून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.

सेंद्रिय शेती ही एक निसर्ग-पूरक स्वयंपूर्ण शेती प्रणाली आहे जी स्थानिक संसाधनांचा वापर करते, कमी भांडवली खर्चाच्या तत्त्वावर आधारित, सेंद्रिय पदार्थांच्या योग्य वापराद्वारे जमिनीची उत्पादकता आणि शाश्वतता वाढवणे, जैवविविधता जोपासणे, आणि पोषण आणि इतर गोष्टींची पूर्तता करणे यावर लक्ष केंद्रित करते. 

सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील सर्व प्रकारच्या जीवांची जलद वाढ होते आणि सर्व रासायनिक प्रक्रिया नियंत्रित होतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेंद्रिय शेतीमुळे प्रदूषण कमी होते

सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असले तरी ते मजबूत आहे. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो.असे ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्रीमती. साविता उपरीकर सरपंच , प्रमुख मार्गदर्शक म्हणून साकोली तालुका कृषी विकास उत्पादक कंपनी चे उपाध्यक्ष श्री. अनिल जी किरणापुरे , संचालक श्री. धर्मेश जी साहारे , साकोली BTM कू. रजनीगंधा 

टेंभूकर , प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे चे क्लस्टर समन्वयक श्री. विकास सी. कटरे. कंपनीने मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. दीपक गाहाने. जय किसान सेंद्रिय शेतकरी बचत गट सानगडी अध्यक्ष. श्री.चुनीलाल हरिहर लोथे,

सतीश आनंदराव खंडाइत ,

 गणेश सदाशिव झिंगरे, 

शिवदास सिताराम दिघोरे,

 योगेश गोपाल वंजारी, 

कमलेश व्यंकटराव खंडाते,

रमेश धोंडूजी मांडवरकर ,

मुनीश्वर पंढरी उपरीकर,

 रविशंकर जनार्दन लोथे,

किशोर उद्धवराव नंदनवार,

 गणेश सदाशिव झिंगरे ,

परसराम लक्ष्मण भानारकर, मिलिंद गरीबदास रंगारी ,

अनिल पुंडलिक तुळशीकर, प्रल्हाद रामकृष्ण हर्षे,

केवळराम गणपत ईटवले, 

रघुनाथ तानबा हटनागर, आनंदराव खंडाइत,

 सदाशिव खर्डेकर,

 खोमेश्वर आत्माराम खंडाईत, योगेश गोपाल वंजारी, रोशन गणपत पराते,

 गंगाधर लहुजी खंडाईत सूत्रसंचालन चुनीलाल लोथे यांनी केले, आभार प्रदर्शन आनंदराव खंडाईत यांनी केले.