त्या माऊलीच्या अश्रुला काय म्हणणार?,”बिचारी पतीसाठी…… — रक्तासह हवी मदत..? 

 

    दिक्षा कऱ्हाडे

मुख्य कार्यकारी संपादक 

          अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जिवन कंठताना ज्यांच्या वेदना त्यांनाच माहीत असतात… आणि अशा असाह्य व एकांगी स्थितीत तर वेदानातंर्गत दु:खाला सीमाच उरत नाही..

         त्या माऊलीसी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता तिच्या अश्रूचा बांध अक्षरशः फुटला आणि ओक्साबोक्शी रडत आपली व्यथा बोलू लागली.

             ज्यांच्या हळद पिसाई चक्कीवर माझे पती रोजंदारीने काम करायचे,”त्या चक्की मालकाचा तिन दिवसांपासून साधा फोन आला नाही आम्हाला! आणि माझे लहान बाळ घरी असताना त्याची विचारपूस सुद्धा केली नाही त्यांनी!..काय म्हणावे मानुष्कीला आणि संकटमय कठीण वेळेला? अशा प्रकारच्या मन हेलावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया होत्या एका पत्नीच्या आणि एका आईच्या! 

         कुणी सांगेल?त्या माऊलीच्या अश्रुला काय म्हणावे? अठराविश्व दारिद्र्यात जिवन जगणारी बिचारी धडपडतय पतीच्या उपचारासाठी… 

       कुणी मदत करेल या आशेने सातत्याने त्या माऊलीचे गहिवरनारे मन व क्षणाक्षणाला पानावणाऱ्या तिच्या डोळ्यांच्या पापण्यांचा अंदाज कुणाला बांधता येईल काय? तद्वतच पतीच्या योग्य उपचारासाठी दाहीदिशा भटकणारे त्या माऊलीचे मन तिला स्वस्थ जगू देत नाही हेच आजचे वास्तव आहे.

           अहो!…ती माऊली चिमूर तालुक्यातंर्गत मौजा नेरी येथील रहिवासी असून तिच्या पतीचा उजवा हात हळद पिसाई करणाऱ्या चक्कीच्या पट्यात गुरुवारला दबला व चेंदामेंदा झाला.

          चेंदामेंदा झालेल्या हाताद्वारे शरिरातील एवढे रक्त बाहेर गेले की,सध्या विलास बनकरच्या शरीराला रक्ताची शक्त गरज भासत आहे व पुढील उपचारासाठी रुपयांची सुध्दा त्यांना निकडीची आवश्यकता आहे.विलास बनकर यांचा,”रक्तगट बी पॅजेटिव्ह,असून रक्तदान दात्यांनी व इतरांनी मानुष्कीच्या नात्याने सहकार्य करावे अशी आर्त हाक सौ.सपना विलास बनकर यांची आहे.

       विलास तुकाराम बनकर सध्या सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार घेत असून त्यांचा संपर्क क्रमांक,:- ७७९८७७१७८४..असा आहे.

         सांगाना!,”कुणी मदत करेल काय? विलास बनकरला?