उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराने अनिल किरणापुरे सन्मानित…

 संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक 

  दखल न्युज भारत 

तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे औचित्य पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती साकोली जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने दुर्गा मंदिर पळसगांव( सोनका)येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन 3 मार्च 2024 रोज रविवारला आयोजित करण्यात आले होते.

      या कार्यक्रमात उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराने अनिल किरणापुरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

        कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण सभापती मदनभाऊ रामटेके यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गंगाधर जिभकाटे जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा यांनी भुषविले.

         मुख्य अतिथी म्हणून हरी गोविंदजी भेंडारकर पं.स. सभापती गणेश आदे,डॉ.जगन्नाथ देशट्टीवार,डॉ.निनाद कोरडे,डॉ.प्रशांत वैद्य,पं.स.सदस्य अनिल किरणापुरे,करुणा वालोदे,सरपंच प्रकाश बागडे,उपसरपंच ज्योतीताई भंडारकर,वंदनाताई मानापुरे,वीरेंद्रजी भांडारकर,डॉ.पंकज वाघाये,दीपक मेंढे,लालचंद लोथे,सरपंच नंदु कावळे,चरण मेश्राम,पाटील मॅडम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

           सदर पशुपक्षी प्रदर्शनीय कार्यक्रमात शेतकरी, पशुपालक, युवा शेतकरी, गावकरी महिला, विद्यार्थी, बालगोपाल उपस्थित होते.