आधी लगीन लोकशाहीचे,दोन नवरदेव लगबगीने पोहचले मतदान केंद्रावर,”सांगवा बु.येथील नवरदेव सागर मदनकर व अंकुश डाहे मतदान करून विवाहाच्या मंडपात…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

        लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशभर साजरा होत आहे.याच अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक करीता दि 26 एप्रिल रोजी सर्वत्र मतदान संपन्न झाले.

       यामध्ये खल्लार नजिकच्या सांगवा बु.येथील नवरदेव सागर श्रीकृष्ण मदनकर व अंकुश सुभाष डाहे यांनी सकाळीच आपल्या भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावून मूर्तिजापूर येथे लग्ना करिता रवाना झाले.

      आधी लगीन लोकशाहीचे मग आपले असा संदेश कृतीतून देणारे नवरदेव सागर मदनकर व अंकुश डाहे,यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       त्यांच्या या निर्णयाचे गावचे सरपंच राजू कराळे,उपसरपंच विजय सगने,तूळसिदास सगणे,सतिश दाभाडे,सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष निलेश कराळे,, विजय मानकर,योगेश वळे,ज्ञानेश्वर सगणे, आकाश मानकर,मंगेश मंगेश संगणे यांनी कौतुक केले आहे.