गरंडा शाळेत हसत खेळत शिवचरित्र उपक्रमाची सांगता… — वंशिका, भूषण, विहान ठरले शिवरत्न पुरस्काराचे मानकरी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे माझी शाळा – माझा उपक्रम अंतर्गत शिवजयंती ते महाराष्ट्र दिन या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्रावर आधारित घेण्यात आलेल्या हसत खेळत शिवचरित्र या उपक्रमाची सांगता महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर करण्यात आली.

          छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्रावर आधारित १९ फेब्रुवारी शिवजयंती ते १ मे महाराष्ट्र दिन या कालावधीत इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हसत खेळत शिवचरित्र हा दहा आठवड्याचा उपक्रम राबविण्यात आला होता.

         या उपक्रमात शिवरायांच्या जीवन चरित्रावर प्रश्नोत्तर लेखन, सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या उपक्रमात वंशिका प्रशांत गजभिये, भूषण श्रावण मोंढे, विहान राष्ट्रपाल बोंबले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार पटकावून शिवरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेत. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण मोंढे, तर प्रमुख अतिथी म्हणून गट ग्राम पंचायत गवना गरंडा सरपंच सोनाली धोटे, ग्राम पंचायत सदस्य अश्विनी गजभिये, भारती मोरकुरे, उपाध्यक्ष व्यंकटी कोहळे, पोलीस पाटील संदीप मेश्राम, सदस्या माया बोंबले, माजी सदस्य राष्ट्रपाल मेश्राम, अंतकला निंबुळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, स्वयंपाकी प्रिया मेश्राम यांनी सहकार्य केले.