उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे रविवार होणार शेतकरी मेळावा.. — आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काय मार्गदर्शन करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष..

 बाळासाहेब सुतार

निर नरसिंहपुर प्रतिनिधी

     इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात येत्या रविवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जाहीर सभा सकाळी 10 वाजता आयोजित केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,श्रीमंत ढोले,कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,सचिन सपकळ,दत्तात्रय बाबर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

        गारटकर म्हणाले,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

        आमदार दत्तात्रय भरणे या मेळाव्यात इंदापूर तालुक्यात आजपर्यंत केलेल्या विविध विकास कामाचे लेखाजोखा सादर करणार आहेत. भविष्यामध्ये इंदापूर तालुक्यात आणखीन सर्वांगीण विकासासाठी काय करणे गरजेचे आहे.यावर भूमिका घेण्यात येईल. 

        अजितदादा पवार सांगतील तेच धोरण व अजितदादा बांधतील तेच तोरण अशी भूमिका इंदापूर तालुक्याची असणार आहे.

       उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे इंदापूर तालुका उभा राहणारा असून,लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुका अधिकचे मताधिक्य देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.