सुसाट कार अनियंत्रित होत धडकली, दोघांचा मृत्यू तीन जखमी.. — साकोली उड्डाणपूलखाली प्रगती चौकातील रात्रीची घटना..

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली : लग्न आटोपून सेंदूरवाफा मित्रांना सोडण्यास जाणा-या सुसाट झायलो कार महामार्गावर अनियंत्रित होऊन अपघात झाला. यात पाच जण होते यातील दोघा युवकांचा मृत्यू झाला तर दोघे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना साकोली उड्डाणपूलखाली महामार्गावर गुरूवार रात्री ११:४५ दरम्यान प्रगती कॉलनी चौकात घडली.

     शहरातील गणेश वार्ड निवासी वैभव मानकर यांकडे गुरूवार ता. २५ ला रात्री ११ दरम्यान सोनका पळसगाव वरून लग्न वरात आटोपून एका मित्राला सेंदूरवाफा सोडण्यास हे पाचही मित्र जात होते. प्रगती कॉलनी चौकापुढे सुसाट वेगाने झायलो कार चालक विशाल वाघाडे हा चालवित होता. कार अनियंत्रित होऊन मध्यभागी लागलेल्या उद्यान लोखंडी बॅरीगेट्स तोडीत पिल्लरला धडकली व विरूद्ध दिशेने आदळली. यात कारचा मागील भाग पूर्ण क्षतिग्रस्त झाला.

         यामध्ये बसलेले संदीप कुरसुंगे २६ गणेश वार्ड साकोली, सारंग कद्रेवार २१ रा. सेंदूरवाफा हे दोघे अतिगंभीर जखमी झाले त्यांना रूग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच या दोघांचाही मृत्यू झाला. तर विशाल वाघाडे २६, प्रणय बैरागी २४ दोघेही गणेश वार्ड हे उपचारासाठी दाखल आहेत. तर जखमी कुणाल ठाकरे १९ रा. सेंदूरवाफा याला उपजिल्हा रुग्णालयातून नागपूर मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. 

        अपघात होतांनाची दृष्ये महामार्ग सीसीटीव्हीत कैद झालेले असून रात्री प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की झायलो कार अगदी सुसाट वेगाने होती आणि अनियंत्रित झाल्यावर मध्यभागी उद्यान वरील लोखंडी तीन ते चार बॅरीगेट्स तोडून कार अतिवेगाने मध्यभागी पिल्लरला आदळली. घटनेची नोंद साकोली पोलीस ठाणे येथे झाली असून अपराध क्र. २१२/२०२४, कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ तसेच सहकलम १८४ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. याचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे व चमु करीत आहेत.