लोकसभा निवडणुकीच्या पूर्व संध्येला समुद्रपुर पोलिसांनी केला देशी – विदेशी दारू साठा जप्त…. — समुद्रपुर पोलिसांची मोठी सक्रिय कार्यवाही…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

वर्धा :– हक़ीक़त या प्रमाणे आहे की गत दी. 25 /4/2024/ रोजी पुलिस स्टेशन समुद्रपुर चे थानेदार संतोष शेगावकर यांना गोपनीय माहिती मिडाली की मौजा -निम्बा गावात राहनारे शालिक बारस्कर व त्याचा मुलगा वैभव गणेश बारस्कर यांनी त्यांचे घरी व शेतात मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या देशी व विदेशी दारूचा साठा लपवून ठेवलेला आहे.

          अश्या माहिती वरुण थानेदार यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपुर चे डी.बी.पथकाचे पोना /प्रमोद थूल पोना /सचिन भालशंकर ,पोशी /प्रमोद जाधव नमूद अरोपितांवर प्रोरेड कार्यवाही करून अरोपितांचे घर झड़ती मधून व शेतात लपवून असलेल्या देशी -विदेशी दारू साठा रॉयल स्ट्रांग कंपनीच्या 90 एम एल च्या विदेशी दारू भरून असलेल्या एकूण 100 शिष्या (2)देशी दारू च्या 90 एम एल च्या 1200 शिश्या (3)एक बजाज कम्पनिची 220 पल्सर बिना नंबर मो. सा (4)एक गोदरेज कंपनीच्या फ्रीज़र असा जुमला कि,3,65,000 रु चा माल जप्त करुन नमूद अरोपितांना विरुद्ध पो,स्टे समुद्रपुर येथे अ.क्र. 459 /2024 कलम (ई)17 (अ)83 मु ,दा ,का अनवये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.

           सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे निर्देशप्रमाने स,पो,नि संतोष शेगांवकर थानेदार पो,स्टे समुद्रपुर यांचे मार्गदर्शनात स,फव विक्की मस्के, स,फव धर्मेंद्र तोमर,पोलीस नाईक प्रमोद थूल, सचिन भालशंकर ,पोलीस अ,प्रमोद जाधव चा ,पोहवा सचिन वाघमारे यांनी केली कार्यवाही दरम्यान मौजा निम्बा येथील पोलीस पाटिल भूपति उरकुड़े,यांनी सहकार्य केले.