छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी :- डॉ. गोविंद तिरमनवार

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

         विर बाजीप्रभू क्रीडा व व्यायाम मंडळ बेलोरा द्वारा संचलित छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे शिवपूर्णा महोत्सव उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

       कार्यक्रमाचे उद्घाटक गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ ऍड. भागवत विधाते, सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख जे डी पाटील महाविद्यालय दर्यापूर, या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते म्हणून उपस्थित असलेले डॉ. गोविंद तीरमनवार इतिहास विभाग प्रमुख, स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय नांदगाव पेठ, डॉ. प्रशांत सातपुते राज्यशास्त्र विभाग प्रमुख गो सी टोम्पे महाविद्यालय चांदूरबाजार, डॉ. निलेश जळमकर चित्रपट दिग्दर्शक, पुरुषोत्तम बावणेर, किशोर मोकलकर पत्रकार, राजूभाऊ पवार सरपंच ग्रामपंचायत टाकरखेडा पूर्णा, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब कडू, सचिव विर बाजीप्रभू क्रीडा व व्यायाम मंडळ बेलोरा तथा सरपंच बेलोरा उपस्थित होते.

            कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवराय जिवन व कार्य या विषयावर डॉक्टर गोविंद तिरमनवार यांनी छत्रपती शिवरायांच्या जिवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले. छत्रपतींच्या श्रेष्ठतम विचारांचा संस्कार युवा मनावर चिरंतर राव व शिवरायांचे चरित्रातून प्रेरणा घेऊन आजची आव्हाने पेलता यावी सोबतच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला ज्ञानपिठ उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून रंजक इतिहास आपल्यासमोर येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने वाचन करून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुनिष्ठ इतिहास समाजासमोर आणला पाहिजे, त्यातूनच नव पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन डॉ. गोविंद तिरमणवार यांनी केले. 

             कार्यक्रमानंतर अंतर महाविद्यालयीन शिवचषक वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे सर उपस्थित होते.महाविद्यालय मधील डॉ रवींद्र इचे. डॉ. भारत कल्याणकर, डॉक्टर हरीश काळे, डॉ आशिष काळे,डॉ. सुवर्णा जवंजाळ प्रा. विपीन लिल्हारे, डॉ प्रविण सदार, कु. मुक्ता निभोरकर, दिनेश वाटाने, विष्णू घोम, संजय सोळंके, अविनाश कडू, तसेच महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.