रविवार दि. 25 फेब्रुवारी इंदापूर येथे पुणे जिल्हा बँक शाखेचे उपमुख्यमंत्री अजित पवार, व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे इंदापूर शाखेचा 5 भूमिपूजन समारंभ रविवारी । (दि. २५) सकाळी दहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाड व उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली.

          शेतकरी व नागरिकांसाठी वरदान ठरलेली इंदापूर शहरातील सर्वात जुनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नवी इमारत अद्यावत पद्धतीने उभारली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना अधिकच्या सुख सुविधा निर्माण होणार आहेत.

          उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार भरणे तसेच बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट कामकाज या शाखेतून पार पडते.