माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदान केले.

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                 भाजप नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बावडा (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि.7) सकाळी सहकुटुंब मतदान केले.

         यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते 3 ऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत हे निश्चित आहे. तर देशात भाजप 400 प्लस चे उद्दिष्ट पूर्ण करेल अशी परिस्थिती आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे, असे मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

          बावडा येथील मतदानानंतर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदारांनी आपला मतदानाचा पवित्रा हक्क बजावावा, तर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.