शाहू महाराज आखाडा, उपराई येथे गाडगेबाबा जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

            बु.रामरावजी खंडारे बहुउद्देशीय समाज विकास संस्था द्वारा संचलित राजश्री शाहू महाराज आखाडा उपराई येथे आखाड्याच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती दिनानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.

           संस्थेचे सदस्य कविताताई बंडू खंडारे यांच्या वतीने हार अर्पण करून उपस्थितांना संबोधित करण्यात आले आणि गाडगेबाबांचे विचार जन माणसापर्यंत पोहचावे ज्या पद्धतीने गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावातील घाण स्वच्छ केली. त्याच पद्धतीने माणसाच्या मनातील घाण स्वच्छ करण्याचे काम सुद्धा गाडगेबाबांनी केले. अमुलाग्र बदल घडवून आणला तो बदल जनमानसापर्यंत पोहोचवावा असे मत संस्थेचे अध्यक्ष आर. एस. खंडारे यांनी व्यक्त केले तसेच गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा दशसूत्री कार्यक्रम प्रत्येकाने जोपासना करावी व जनमानसात आचरण करावे. जेणेकरून महापुरुषांसारखे संतांसारखे विचार संता सारखी प्रतिमा समाजामध्ये आपल्याला मिळेल.

           त्यामधून सुजाण सुज्ञ व‌ समृद्ध नागरिक निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश असून संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित डी. वाय. खंडारे बी.डी. खंडारे आर एस खंडारे के.बी. खंडारे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूषण खंडारे यांनी केले.