चिमूर प.स.कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड यांच्या अनागोंदी व गैर आर्थिक व्यवहार कारभाराची तात्काळ चौकशी होणार काय? — अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे अशी जनमानसात चर्चा..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत बेकायदेशीरपणे विहिरी मंजूर करणे व सदर निकृष्ट दर्जाच्या विहीर बांधकामातंर्गत बेकायदेशीर देयके काढणे म्हणजे शासनाच्या रास्त धोरणाला न मानने होय.

      अशाच पद्धतीची कार्यपध्दत चिमूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड यांनी अंगिकारली असून बेकायदेशीर विहीर मंजूर करणे व निकृष्ट दर्जाच्या बेकायदेशीर विहिरी बांधकामातंर्गत देयके काढण्याचा प्रकार उघड झाला असून सामाजिक माध्यमांवर माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांनी विहिर लाभार्थ्यांच्या नावासह सार्वजनिक केला आहे.

         तद्वतच चिमूर प.स.कृषी अधिकारी एका विहिरी मागे १० हजार रुपये घेतल्याशिवाय विहीर बांधकाम देयके काढीत नसल्याची बाब आॅडियो क्लिप द्वारा उघडकीस आली आहे.

          कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड हे विहीर देयके काढण्यातंर्गत रुपये व्यवहार करीत असल्या संबंधातील आॅडिओ क्लिप एका ठेकेदाराची हाती लागली असून त्या आॅडिओ क्लिपची सत्यता तपासून पाहणे आवश्यक आहे.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत विहीर बांधकाम करण्याचे ठेके देता येत नसताना आपल्या मर्जीतील किंवा राजकारण्यांच्या मर्जीतील व्यक्तींना नियमबाह्य विहीर बांधकाम करण्याचे ठेके कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड यांच्या कार्यकाळात देण्यात आले.

        चिमूर तालुकातंर्गत ठेका पध्दती अंतर्गत विहीर बांधकामे निकृष्ट दर्जांचे झाली असून दोन-तीन वर्षांतच विहीर बांधकामे खचू लागली आहेत.यामुळे शासनाच्या योग्य उद्देशाला चिमूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड हे हरताळ फासत असल्याचे पुढे आले आहे.

       तद्वतच भाऊसाहेब राठोड यांच्या विहीर बांधकाम आर्थिक व्यवहारांची व विहिरी बांधकाम अनियमिततेची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी,असी चिमूर तालुक्यातील जनमानसात खमंग चर्चा आहे.