जि.प.शाळा माजरी म्हसला येथे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

        जि. प. शाळा मांजरी म्हसला येथे नुकताच सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सहावीच्या विद्यार्थीनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद रुमणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय शालेय पोषण आहार अधिक्षक तथा केंद्रप्रमुख कल्पनाताई वानखडे ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख भाऊ, मुख्याध्यापिका दिपिका अर्बाळ, गजानन देशमुख, सुरज मंडे आणि प्रियंका राणे मंचकावर उपस्थित होते.

           शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अनोखे नाते असते याबद्दल कल्पनाताई ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमांमध्ये दिपिका अर्बाळ, गजानन देशमुख, सुरज मुंडे आणि प्रियंका राणे ,ऊज्वला भडांगे, सुषमा गीरी, प्रेरणा पेठे, रेखा बोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ. कविता शरद रमणे यांना तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंखुडी रंगारकर हिने केले तर आभार प्रदर्शन दिव्या बांबोळे हिने पार पाडले, विद्यार्थ्यां मधून आरुषी चव्हाण, कृष्णाली ढेपे, अश्विन बांबोळे, तेजश्री निकोडे, सिद्धी गजभिये, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

           आपल्या मनोगतामधे शाळेच्या सहवासातील सात वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाकरिता रेखा बोकडे, उज्ज्वला भडांगे, सुषमा गिरी, प्रेरणा पेठे आणि शालेय विद्यार्थी सपना मांगीलाल मेहरा, श्रावणी प्रमोद तुमसरे, निधी सुभाष गारोडे, सिद्धी धर्मपाल गजभिये, दिव्या संदीप नागोलकर, कोमल प्रविण चव्हाण, तेजश्री मुरलीधर निकोडे, आरुषी विजय चव्हाण, जय चव्हाण, सम्यक विजेंद्र करोडे, आर्यन निलेश डोलारे, आश्विन मिलिंद बांबोळे, सोहम शशिकांत अंबादे, अंशू दिनेश डोक, प्रतिक दिनेश साखरे, उमंग शरद रूमणे, अनूष राहुल मेश्राम, नैतिक प्रमोद कायटे, वेदांत राजू चवरे.तसेच सहावीच्या विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.