आळंदीत महायुतीचा एकच निर्धार, शिवाजीराव आढळराव पा. होणार खासदार.. !

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

”मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे” असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी आळंदी येथे केले.

             लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतसा प्रचाराला देखील वेग येत आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात दौरा केला. आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले आळंदी तील शिव लाॅन्स येथे आळंदी शहरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून महायुतीच्या विजयासाठी आशिर्वाद घेतले.

              यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, मनसे नेते बाबू वागस्कर, भगवान पोखरकर, अनिल राक्षे, डि.डि.भोसले पाटील, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण, मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, राजाराम लोखंडे, अरुण चौधरी, रामभाऊ भोसले, सचिन काळे, सागर भोसले, पांडुरंग वहीले, सौरभ गव्हाणे, आकाश जोशी, आनंद वडगावकर, माऊली बनसोडे, संकेत वाघमारे, राहुल थोरवे, निसार सय्यद, संगीता फपाळ, रुक्मिणी कांबळे, सुनीता रंधवे, नियती शिंदे तसेच महायुतीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.