देश श्रेष्ठ की तत्वप्रणाली श्रेष्ठ……

         ” इतिहासाची ही पुनरावृत्ती होईल काय? या विचारानेच माझे काळीज चर्रर्रर्र होते……

   यात आणखी एका चिंतेची भर पडलेली आहे.कारण, जातीभेदांच्या बुजबुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्वप्रण्यालांचाही एकच गोंधळ उडालेला आहे.अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून तत्व प्रणालीस दुय्यम स्थानी मानेल की तत्त्वप्रणालीसच देशाच्या डोक्यावर ठेवील?

        याचे उत्तर मला काही माहीत नाही.तथापि,एवढे मात्र निश्चित की,जर देशापेक्षाही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य जाईल,आणि ते कधीही परत मिळणार नाही…! या संभवनीय घटनेसंबंधी आपण डोळ्यात तेल घालून दक्ष असले पाहिजे.”

***

लोकशाहीचे भवितव्य…

         “तारीख 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर होईल. म्हणजे नव्या घटनेप्रमाणे लोकांची, लोकांकडून चालणारी व लोकांसाठी काम करणारी राजवट सुरू होईल. याठिकाणी देखील वरील विचारच माझ्या मनात घुटमळतात.भारताच्या लोकशाही घटनेची धडगत काय होईल?

     लोकशाही घटना जतन केली जाईल की,तिचे पुनश्च अपहरण होईल?या दुसऱ्या विचाराने माझे चित्त पहिल्या विचारा इतकेच व्यग्र होते.

             भारताला लोकशाहीची ओळख नव्हती असे नव्हे. भारतामध्ये एकेकाळी अनेक प्रजासत्ताक राज्ये तसेच राजघराणीही होती. जेथे राजे लोक राज्य करीत तेथे देखील लोकशाही लोकमतानुसार कारभार चाले……

  अगर राजाच्या अनियंत्रित सत्तेवर नियंत्रण टाकण्यात येत. पार्लमेंट अगर पार्लमेंटरी पद्धती भारतास माहीत नव्हत्या,असेही नव्हे. बौद्ध भिक्षुकांच्या संघाचे परीशीलन केल्यास हे स्पष्ट दिसून येते की,भारतात नुसती पार्लमेंटच होती असे नव्हे तर आधुनिक पद्धतीचे पार्लमेंटरी नियमही त्यांना पूर्ण अवगत होते. पार्लमेंटात कोणी कुठे बसावे, ठराव कसे आणावे,’कोरम ‘किती असावा,पक्षप्रमुख कोणास म्हणावे,गुप्त मतदान कसे करावे, अविश्वासाचा ठराव कसा संमत करावा,वगैरे संबंधी बौद्धभिक्षुकांनी आपल्या संघात नियम केले होते.हे पार्लमेंटरी नियम गौतमबुद्ध फक्त भिक्षुकांच्या संघासच लागू करीत होते,हे जरी खरे असले तरी, बुद्धाने ते नियम तत्कालीन चालत असल्यास राज्यपद्धतीतून घेतली असावीत हे उघड आहे.

        वरील प्रकारची लोकशाही पद्धती भारतातून निघून गेली आहे.तिची पुन्हा एकदा हकालपट होईल काय? तेही मला माहित नाही.परंतु गेली,कित्येक वर्ष या देशातील लोकशाहीवर माती पडली असल्याकारणाने लोकशाहीच्या ठिकाणी हुकूमशाहीची स्थापना होईल की काय अशी भीती वाटते अथवा लोकशाही नावाला राहील आणि व्यवहारात हुकुमशाहीच नांदेल यापैकी दुसराच धोका अधिक संभवनीय वाटतो.

**

 अराजकतेचे व्याकरण…

      आपल्याला प्रकारात आणि व्यवहारातही लोकशाही हवी असेल तर आपण काय केले पाहिजे? मला वाटते,आपण प्रथम जर कोणती गोष्ट करावयास पाहिजे तर ती ही आहे की,सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सनदेशीर मार्गाचा अवलंब आपण निग्रहाने केला पाहिजे.याचा अर्थ असा की,घातपाती व रक्तरंजित असे क्रांती मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजे. म्हणजेच, कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यांना मुठमाती दिली पाहिजे. 

       जेव्हा,आर्थिक व सामाजिक प्रश्न सनदशीर मार्गाने सुटत नाहीत तेव्हा फार तर बेसनदशीर मार्गाचे समर्थन होऊ शकते. बेसनदशीर मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. त्याला जितक्या लवकर रामराम ठोकता येईल तेवढे कल्याणचेच होईल.”

***

महान व्यक्तीलाही स्वातंत्र्य विकू नका…

       “दुसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की,जॉन स्टुअर्ट मिलने,लोकशाहीच्या पुरस्कर्त्यास व संरक्षकास दिलेल्या धोक्याच्या सूचनेचे परिपालन केले पाहिजे. 

 जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो,”मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या देखील चरणावर तुम्ही आपले स्वातंत्र्य अर्पिता कामा नये,अगर शासन संस्थाचा तो दुरुपयोग करील एवढी सत्ता देखील त्याच्याकडे तुम्ही विश्वस्त म्हणून ठेवू नये. “

     “ज्यांनी आपली उभी हयात सेवेसाठी खर्ची घातली,त्या महापुरुषांना कृतज्ञ राहण्यात काही चूक नाही.परंतु , कर्तज्ञतेसही काही मर्यादा आहेत. याबाबत डॅनियल कॅनेल आयरिश देशभक्ताचे विचार ध्यानात ठेवण्यासारखे आहेत.तो म्हणतो

“मोठ्या माणसांशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर एखाद्यास आपला एखाद्या आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवा लागत असेल, अगर एखाद्या स्त्रीस तिचे शील भ्रष्ट करावे लागत असेल तर ते कशी शक्य आहे? 

      अगदी याच न्यायाने राष्ट्राचे स्वातंत्र्यच एवढे एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करायचे असेल तर तेही शक्य नाही. “

     या धोक्याच्या इशाऱ्याची आवश्यकता इतर देशापेक्षा भारताला अधिक आहे. कारण, भारतीय राजकारणात,भक्तीचा, निष्ठेचा अगर विभूतीपूजेचा जेवढा खेळ दिसतो त्याला जगातील विभूतीपूजेत कोठेच तोड Let’s नाही.  

     धार्मिक भक्तीत आत्म्याची मुक्ती असू शकेल,परंतु राजकीय भक्तीमधून खात्रीलायक अध:पाताचा मार्ग आहे. त्यातूनच हुकूमशाही निर्माण होते. “

 —– डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( भारताच्या संविधानाच्या शिल्पकाराचे संविधान सभेतील समारोपाच्या भाषणाचा काही भाग ) 

      वरील भाषणातुन प्रत्येक भारतीय संविधाननिष्ठ नागरिकांने काय बोध घ्यावा मी हे ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेवर सोडूतो…..

आणि मी माझे ध्येय संविधान जागृतीसाठी समर्पित करतो…. 

          आवाहनकर्ता 

         अनंत केरबाजी भवरे 

(संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर 7875452689)