ब्रेकिंग न्यूज… — काद्री येथे आर्थीक वादविवाद सुरू असताना बंदूकीतील गोळी लागली आईला..  — आरोपीला अटक,ग्रामीण पोलीस अधीक्षकांची पथकासह घटनास्थळाला भेट..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

कन्हान : – जे.एन.दवाखाना कांद्री परिसरात सुनिल तिवारी हा आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान घरी असताना तिन इसम येऊन त्याच्याशी घरासामोर रस्त्यावर आर्थिक व्यवहारातंर्गत भांडण करीत होते.

            भांडण सुरू असताना त्याची आई वादविवाद मिटवण्यासाठी गेली असता सुनिलच्या हातात असलेल्या बंदुकीची गोळी चालुन आई शोभा तिवारीच्या हाताला लागली व ती जख्मी झाली.

          तिला कामठी येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.प्रकरणाची माहीती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार उमेश पाटील,एपीआय पराग फुलझेले,पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी पोहचून आरोपी सुनिल तिवारी यांना अटक केली व हत्यार जप्त केले.पुढील तपास पो.नि.उमेश पाटील करित आहे.

          घटनास्थळी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.हर्ष ए.पोद्दार,ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री.रमेश धुमाळ,उपविभागिय अधिकारी गायकवाड,ओमप्रकाश कोकाटे पो.नि.स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण यांनी तपास यंत्रानेसह घटनास्थळाला भेट दिली.