बाबुलवाडा जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

         पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील बाबुलवाडा येथे जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे साजरी करण्यात आली.

              छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते.मुख्यध्यापक उमाकांत बांगळकर यांचे मार्गदर्शनात सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला..

         साहायक शिक्षीका सारिका भोयर,अंगणवाडी सेविका श्रीमती शिलाबाईअलोने,अश्विनी वाघाडे,भाग्यश्री पाकळे,दिपालीताई झुरे,श्रीमतीशकुंतला सोनबावने,सह विद्यार्थी पालक वर्ग व गावातील नागरिक प्रामुख्याते उपस्थित होते.